Saturday, April 20, 2024

/

चोरी केलेली चार चाकी वाहने जप्त

 belgaum

निपाणी पोलिसांनी चोरीच्या नऊ ट्रक, दोन टिप्पर आणि दोन कार हस्तगत केल्या आहेत.एका आरोपीला अटक करून 17840000 किमतीची वाहने हस्तगत केली आहेत.

चिकोडी तालुक्यातील अंकली गावचा कल्लाप्पा सुनील कदम (24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याचे आणखी साथीदार फरारी झाले आहेत.वाहन चोरीचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी इचलकरंजी पोलिसांनी दहा ट्रक चोरीच्या पकडल्या आहेत.कल्लाप्पा याचे अंकली गावात मोठे गोडाऊन असून तेथे चोरीची वाहने आणून चेस नंबर बदलून त्याची विक्री केली जात होती.

वाहन चोरटे गॅरेज मधील आणि रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने चोरत होते.निपाणीपोलिसांनी तीन पथके करून वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.