Wednesday, April 24, 2024

/

सी ई टी चे वेळापत्रक जाहीर

 belgaum

इंजिनीअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सामान्य प्रवेश चाचणी अर्थात सीईटी परीक्षा 22 23 आणि 24 एप्रिलला होणार आहे.

यासंदर्भात कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने एक पत्रक काढले आहे. बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स 22 एप्रिल रोजी ,फिजिक्स आणि केमिस्ट्री 23 एप्रिल रोजी आणि कन्नड लैंग्वेज परीक्षा 24 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत.

2020 च्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रीकी बरोबरच कृषी विज्ञान ,बी फार्म, डी फार्म आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.

 belgaum

बारावीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच सीईटीची परीक्षा घेण्याची परंपरा कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने जपली आहे. बारावी परीक्षेचा निकाल लागल्या लागल्या या परीक्षेचा निकाल लागतो आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होते. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या व्यवसायिक महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.