बेंगलोरचा कुमार आर के ‘मि. अशोक क्लासिक 2020’ किताबाचा मानकरी बेळगावचा उमेश गंगाने बेस्ट पोझर

0
 belgaum

रामदुर्ग तालुका शरीरसौष्ठव संघटना आयोजित मि. अशोक क्लासिक – 2020 शरीरसौष्ठव स्पर्धेतील ‘मि. अशोक क्लासिक 2020’ हा किताब बेंगलोरच्या कुमार आर. के. याने पटकाविला. किताबाच्या लढतीत बेळगावचा विकास सूर्यवंशी उपविजेता ठरला तर उमेश गंगाने याने बेस्ट पोझर किताब मिळविला.

रामदुर्ग तालुका शरीरसौष्ठव संघटनेतर्फे गेल्या 24 जानेवारी रोजी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी वुमन्स बिकनी स्पोर्ट्स – 2020 या किताबाची शरीरसौष्ठव स्पर्धा देखील घेतली गेली. या स्पर्धेत ‘वुमन्स बिकनी स्पोर्ट्स 2020’ हा किताब बेंगलोरच्या अंकिता सिंग हिने हस्तगत केला. बेळगावच्या केतकी पाटील हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

bg

सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रामेश्वरी मेटगुड, संगीता रायबाग, पद्मा सिद्धलिंगनावर, रामदुर्गचे माजी आमदार अशोक पट्टण, जि. पं. सदस्य कृष्णा लमानी, रामदुर्गचे माजी नगराध्यक्ष राजू माने आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डर्सचे (केएबीबी) अधिकारी अजित सिद्दणावर, सरचिटणीस नीलकांत उमामेश, जी. बी. भट, प्रेमनाथ उल्लाळ, दीपककुमार तुलसीदार, एम. गंगाधर, वस्त्रद, सुधाकर व सुनील राऊत यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामदुर्ग तालुका शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ जहागीरदार, सरचिटणीस रवी पम्मार, उपाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मिस्टर अशोक क्लासिक 2020 शरीरसौष्ठव स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. 55 किलो वजनी गट : 1) उमेश गंगाने बेळगाव, 2) अल्ताफ चौधरी धारवाड, 3) सचिन कुंभार बेळगाव 4) राजू दुरगुडे बेळगाव, 5) विजय पाटील बेळगाव. 60 किलो वजनी गट : 1) अविनाश मंतोष धारवाड, 2) नीलेश मोहिते बेळगाव, 3)किरण तरळे बेळगाव, 4) शिवकुमार पाटील बेळगाव, 5) रोहित नेरूरकर बेळगाव. 65 किलो वजनी गट : 1) केदार पाटील बेळगाव, 2) विकास शहापूरकर बेळगाव, 3) उज्वल नरगुंद धारवाड, 4) सुनील सोलापूर बीजीएम/रामदुर्ग, 5) विठ्ठल गुडदार धारवाड. 70 किलो वजनी गट : 1) प्रताप कालकुंद्रिकर बेळगाव, 2) गणेश पाटील बेळगाव, 3) हरीश उतळसर बागलकोट, 4) अरुण कळ्ळीमठ धारवाड, 5) मुतु भुमन्‍नावर बीजीएम/ रामदुर्ग.

75 किलो वजनी गट : 1) अफरोज तहसीलदार बेळगाव, 2) सुनील भातकांडे बेळगाव, 3) सोमशेखर उडपी, 4) रऊफ अली बेळगाव, 5) गुरुनाथ पुजारी बेळगाव. 80 किलो वजनी गट : 1) कुमार के. बेंगलोर, 2) करण देसुरकर बेळगाव, 3) विवेक नेसरकर बेळगाव, 4) गजानन काकतीकर बेळगाव, 5) काशिनाथ नापकर धारवाड. 80 किलो वरील वजनी गट : 1) विकास सूर्यवंशी बेळगाव, 2) रोहित चव्हाण बेळगाव, 3) शटुप्पा जाधव बेळगाव, 4) सनी महिकर बेळगाव, 5) मकसूद गुंडवडी बेळगाव. वुमन्स बिकिनी स्पोर्ट्स 2020 : 1) अंकिता सिंग बेंगलोर, 2) केतकी पाटील बेळगाव, 3) शारदा नायक दक्षिण कन्नडा, 4) शराॅन दक्षिण कन्नडा.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.