Wednesday, May 8, 2024

/

ती आग गॅस गळतीमुळे नव्हे…

 belgaum

शहरातील बॉक्साइट रोड येथे गॅस पाईपलाईनला आग लागल्याचे जे वृत्त सोशल मीडियावर बुधवार सकाळपासून पसरत आहे ते पूर्ण पणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मेगा गॅस लिमिटेडने (एमईआयएल) या वृत्ताचे खंडन केले आहे.
कुमारस्वामी लेआउट कडे जाणाऱ्या बॉक्साईट रोड येथे गॅस पाइपला गळतीमुळे आग लागल्याचे वृत्त सोशल मीडियावर बुधवारी सकाळपासून पसरविण्यात येत आहे. या बरोबरच आगीमुळे काळ्‍या धुराचे लोट आकाशात उडतानाचा व्हिडिओ दाखविला जात आहे. मात्र प्रत्यक्षात टाकाऊ टायर्स किंवा रबर अथवा टाकाऊ साहित्याला आग लागल्याने संबंधित ठिकाणी काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात उठत आहेत. खुद्द मेगा गॅस लिमिटेड एम आय एल गॅस पाईपलाईन आग लागल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. नैसर्गिक वायु (नॅचरल गॅस) हा प्रदूषण मुक्त असतो त्यामुळे तो जळाल्यास काळा धूर येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान मेगा गॅसचे मार्केटिंग मॅनेजर कामिनी पाशा पटाईक यांनी गॅस लिकेजमुळे बॉक्साईट रोड येथे आगीची दुर्घटना घडल्याचे जे वृत्त सोशल मीडियावर पसरवले जात आहे ते खोटे असल्याचे जाहीर केले आहे. संबंधित आगीची घटना गॅस गळतीमुळे नव्हे तर टाकाऊ टायर्स अथवा तत्सम साहित्य जळाल्यामुळे घडली असल्याचे सांगितले.

Viral vdo
Burn vdo tyre rubber belgaum

नॅचरल गॅस हा प्रदूषण मुक्त असतो त्यामुळे तो जळाल्यास काळा धूर येत नाही. तेंव्हा ज्या ज्या लोकांनी गॅस पाईपलाईन दुर्घटनेचे पोस्ट सोशल मीडियावर टाकले आहे ते कृपया त्वरित मागे घ्यावे आणि खोट्या बातम्या आणि अफवा पसरण्यावर आळा घालावा अशी जाहीर विनंतीही कामिल पाशा त्यांनी केली आहे.

 belgaum

बेळगाव शहरात कोणतीही घटना घडलो की लगेच सोशल मीडियावर व्हीडिओ वायरल होत असतात मात्र खऱ्या घटनांची माहिती घेऊनच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यानी व्हीडिओ व्हायरल करण्याची गरज आहे.काल मंगळवारी घडलेल्या घटनेचा व्हीडिओ आज बुधवारी  गॅस गळतीचा व्हीडिओ म्हणून व्हायरल करणाऱ्यानी विचार करण्याची गरज बनली आहे.

व्हायरल व्हीडिओ पहा खालील लिंक मध्ये …

बेळगावातील गॅस गळतीचा व्हीडिओ नव्हे कुमारस्वामी ले आऊट मध्ये गॅस पाईपलाईन गळतीने आग लागली आहे असे नमूद करत हा व्हीडिओ…

Posted by Belgaum Live on Wednesday, December 11, 2019

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.