Friday, April 19, 2024

/

‘आमटी अंगावर पडल्याने तीन मुली भाजून जखमी’

 belgaum

मध्यान्ह आहारातील स्वयंपाक केलेली गरम आमटी अंगावर पडल्याने तीन लहान मुली जखमी झाल्या आहेत. खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथे बुधवारी दुपारी झालेल्या घटनेत दोन बहिणी सह एकाच घरातील तीन चिमुरड्यां मुली भाजल्या  आहेत.

याबाबत समजलेल्या अधिक माहिती गोल्याळी येथील अंगणवाडीत ही दुर्दैवी घटना घडली आहे मध्यान्ह आहार योजनेतील स्वंयपाक करतेवेळी उखळत्या गरम आमटीचे भांडे घेऊन जाताना अंगणवाडीत बसलेल्या मुलांच्या अंगावर पडले त्यात तीन भाजून जखमी झाली आहेत.लागलीच जखमी मुलांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

संजना शिवाजी कोलम वय 4 व सानवी शिवाजी कोलम वय 4 या दोघी बहिणी तर समीक्षा गोविंद कोलम वय 4 रा.गोल्याळी या एकाच घरातील तीन लहान मुली भाजल्या आहेत.तिघींच्या पायाला कमरे खालील भागाला इजा झाली आहे.

 belgaum

सत्तर वर्षीय अंगणवाडी सेविकेच्या हातातून अमटीचे गरम भांडे पडल्याने ही घटना घडली आहे त्यामुळे इतके झालेल्या म्हाताऱ्या महिलांना कसं काय सेविका म्हणून काम देतात असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

भाजून जखमी झालेल्या लहानग्या मुलांच्या वर के एल ई इस्पितळात उपचार सुरू आहेत.भाजून जखमी झालेली चिमुरडी बालक आक्रोश करत होती हे चित्र पालक आणि इतरांचे मन हेलावून टाकणारे होते यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वाढत आहे.खानापूर सी डी पी ओ यांना या घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला असतां त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.