भीमा शंकर पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर आज शनिवारी बेळगाव येथे दगडफेकीचा प्रकार घडला असून संबंधित उपद्रवी लोकांना वेळीच आवर घाला अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे.
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील या म्होरक्याने म. ए. समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला असे बेताल वक्तव्य केल्यानंतर आता बेळगाव शहरातील मराठी फलकांना समाजकंटकांकडून लक्ष्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. बसवान गल्ली, बेळगाव येथील एका दुकानावरील फलकाची समाजकंटकांकडून मोडतोड करण्याचा प्रकार आज शनिवारी घडला. यामुळे बसवान गल्ली येथे काही काळ तणावाचे वातावरण होते. तसेच नागरिक गटागटाने या दगडफेकीच्या घटनेबद्दल तर्कवितर्क लढविताना दिसत होते.
दरम्यान, मराठी भाषिकांना जाणून-बुजून लक्ष करणाऱ्या उपद्रवी लोकांना प्रशासनाने वेळीच आवरावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा म. ए. समितीने दिला आहे.
कानडी संघटनेचा निषेध
कन्नड संघटना कडून मराठी भाषिक आणि शिवसेने बद्दल कुलहेकुई सुरूच आहे अश्या शब्दात बेळगाव शिवसेनेनं करवेचा निषेध व्यक्त केला आहे.
अश्या संघटनेवर पोलिसांनी आवर घालावा कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.