Friday, March 29, 2024

/

हेब्बाळकरला हरवण्यासाठी माझे पाच कोटी

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघा पैकी भाजप आमदारांची संख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी बजावलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी पुढील निवडणुकीत हा आकडा वाढवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.सध्या जिल्ह्यात भाजप आमदारांचा आकडा 11वरून 14 वर पोहोचला आहे.

बेळगावात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आगामी निवडणुकीत हा आकडा वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन असे सूतोवाच्य केलं आहे.ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या विध्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पराभव करण्यासाठी स्वतः पाच कोटी रुपये खर्च करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

पोटनिवडणूक जिंकताच त्यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीकेची झोड उठवत आपण ग्रामीण मतदारसंघात काम करणार असल्याचे म्हटले होते. रमेश यांनी केवळ ग्रामीण मतदार संघच नव्हे तर यमकनमर्डी मतदारसंघात देखील भाजपचं निवडून आणू असेही म्हटले आहे.Ramesh jarkiholi

 belgaum

रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील तुष्ट सर्वश्रुत आहे मागील निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात एक लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन 50 हजार मतांच्या फरकांनी त्या निवडणून आल्या होत्या.ग्रामीण मतदारसंघावर मराठयांचे प्राबल्य आहे 1 लाख 10 हजार मराठा मते आहेत त्यामुळे मराठा उमेदवार देऊन हेब्बाळकर यांना पट्कनी देऊ असेही ते म्हणाले होते.

ग्रामीण मतदारसंघात भाजप कडून मराठा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठा असे दोन मराठा उमेदवार उभे राहिल्यास त्याचा फायदा कोणाला? यावर देखील जारकीहोळी स्ट्रॅटेजी बनवतात का हा चर्चेचा विषय आहे.मागील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने कमकुवत उमेदवार दिला होता जर यावेळी समितीने उमेदवार बदलल्यास मते वाढू शकतात त्यातच महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार आहे त्यामुळे समिती देखील बळकट होत आहे यावर त्यांची काय रणनिती असणार आहे हा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.