1967 साली विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून खुली निवडणूक लढवली व निवडून आलो या साऊथ कोंकण एज्युकेशन संस्थेकडून मला राजकारणात प्रेरणा मिळाली त्यामुळेच आजवर राजकारणात यशस्वी झालो असे मत माजी मंत्री आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केले.
शनिवारी सकाळी बेळगावातील साऊथ कोंकण शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सवाचे दीप प्रजवलन करून उदघाटन केल्यावर बोलत होते.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी किरण ठाकूर यांनी अमृत महोत्सवी स्मरणिकेचे उदघाटन केलं. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सेवांतीलाल शाह,अध्यक्ष आर डी शानभाग,अनंत लाड,विनायक जाधव,व्यासपीठावर उपस्थित होते.सुरुवातीला स्वागत बिंबा नाडकर्णी यांनी केलं तर लता कित्तुर यांनी अमृमहोत्सवाची माहिती दिली.
एस के ई शिक्षण संस्था ही देशातील सर्वोत्तम संस्थापैकी एक आहे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज बनली आहे यासाठी स्वतः सुशिक्षित बनून इतरांना देखील सुशिक्षित करायला हवे असेही देशपांडे म्हणाले.
शिक्षण संस्थांनी जनतेला परवडेल अश्यात उत्तम दर्जेदार शिक्षण देणे देखील काळाची गरज बनली आहे.शिक्षण संस्था मधून गुणवन्त विद्यार्थी बाहेर पडत आहेत अश्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे असे देखील आर व्ही म्हणाले.
एस के ई संस्थेला पाच कोटींची देणगी
किरण ठाकुर यांनी आपल्या भाषणात संस्थेत भ्रष्टाचार नसल्यामुळे या संस्थेचा शैक्षणिक दर्जा उच्च असल्याचे सांगितले क्रमांकाची चळवळ या ठिकाणाहून सुरू झाली तशी तशी तशी चळवळ येथून सुरू झाली पाहिजे असे सांगून किरण ठाकुर यांनी लोकमान्य सोसायटीतर्फे सोसायटीला पाच कोटी रुपयांची देणगी जाहीर केली
सूत्रसंचालन प्रा.उदय अरळीकट्टी यांनी तर प्रा.आर जे पोवार यांनी आभार मानले.उद्योजक दिलीप चिटणीस यांच्या हस्ते फोटो गॅलरी उद्घाटन झाले.