Thursday, April 25, 2024

/

गोवा बनावटीची 54 लिटर दारू जप्त

 belgaum

अबकारी खात्याच्या चिकोडी उपविभाग पथकाने निपाणीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर एका कारमधून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेला 54 लिटर दारूचा अवैध साठा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
अबकारी खात्याच्या चिकोडी उपविभाग पथकाने निपाणीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर मारुती ब्रिझ (क्र.एमएच 14 एचडी 8383) या कारमधून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेला गोवा बनावटीचा 54 लिटर दारुचा साठा जप्त केला. यामध्ये गोवा प्रीमियम ब्रँडच्या इम्पेरियल बल्यू व्हिस्की, मॅकडॉल व्हिस्की, ओल्ड मंक रम आणि रोमानोव्ह होडका या दारूच्या 750 एमएल बाटल्यांचा समावेश आहे.

Arrrack seige
Arrrack seige

याप्रकरणी चंदगड तालुका महाराष्ट्र येथील लक्ष्मण बाळू चव्हाण याला अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अबकारी खात्याच्या चिकोडी उपविभाग उपाधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.