Thursday, April 25, 2024

/

आय टी बी पी च्या जवानाचा मृत्यू

 belgaum

ट्रेनिंग दरम्यान इंडो तिबितेयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या एका जवानांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे.बेळगाव जवळील वंटमुरी हालभावी येथे असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स च्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ही घटना घडली आहे.

राजेंद्रसिंह नरेंद्रसिंह दानिक वय 34 रा.उत्तराखंड असे या पोलीस जवानांचे नाव आहे.प्रशिक्षण सुरू असताना दुसऱ्या मजल्या वरून पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

मात्र तो पाय घसरून पडलाय त्याने आत्महत्या केली आहे का?किंवा आणखी काय हे पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे. काकती पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.