मिलिंद भातकांडे यांना इंडिया आयकॉन अवॉर्ड

0
 belgaum

बेळगाव शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन दिल्ली येथील ब्लीन्ड विंक या संस्थेतर्फे 2019 चा इंडिया आयकॉन अवॉर्ड एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांना प्रदान करण्यात आला आहे.ब्लीन्ड विंक ही संस्था देशभरात कार्यरत असून बेंगळूर येथील केंपेगौडा इंटरनॅशनल विमानतळाच्या परिसरात असणाऱ्या ताज हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री दिया मिर्जा यांच्या हस्ते मिलिंद भातकांडे यांना इंडिया आयकॉन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या सचिव मधुरा भातकांडे या देखील उपस्थित होत्या.

ब्लीन्ड विंक ही राष्ट्रीय संस्था असून देशभरातील औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना इंडिया आयकॉन अवॉर्ड देण्यात येतो यावर्षी देशभरातील 80 लोकांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील थोर समाजसेवक आणि माजी नगराध्यक्ष कै. गजाननराव भातकांडे यांनी 1970 साली बहुजन समाजासाठी इंग्रजी शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत यासाठी शाळेची स्थापना केली त्यानंतर गेल्या 25 वर्षांपासून मिलिंद भातकांडे हे शाळेची यशस्वीरित्या धुरा सांभाळत आहेत.

bg
Milind bhatkande
Milind bhatkande

शाळेत गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत तसेच त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही शाळा आघाडीवर असून मिलिंद भातकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या क्रिकेट व फुटबॉल पटूंनी इंग्लंड दौरा केला आहे तसेच दोन खेळाडूंना बँकॉक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शाळेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल घेत 2018 साली ब्रिटीश कौन्सिलचा प्रतिष्ठेचा पुरस्कार शाळेला मिळाला आहे. शाळेतर्फे सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत असून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याबरोबरच दरवर्षी ज्या विद्यार्थांचे पितृछत्र हरपले आहे आणि गरीब असलेल्या 10 विद्यार्थाना मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी शाळेने पुढाकार घेतला तसेच खानापूर तालुक्यातील मांजरपडी या दुर्गम गावातील लोकांपर्यंत जाऊन मदत देण्याचे काम शाळेतर्फे करण्यात आले तसेच भातकांडे स्पोर्ट्स अकादमीतर्फे शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर गेल्या 5 वर्षांपासून बेळगाव चॅपिंयन्स क्रीकेट लीग ही स्पर्धा आयोजित केली जाते यामध्ये राज्यातील नामवंत क्रिकेटपटू सहभागी होतात.

या सर्व कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा इंडिया आयकॉन अवॉर्ड त्यांना देण्यात आला आहे. या अवॉर्ड वितरण सोहळ्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मिलिंद भातकांडे यांनी शाळेच्या प्राचार्या दया शहापूरकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पालक यांचे आभार मानीत पुरस्कार मिळण्यात कुटुंबातील सदस्यांसह सर्वांचे सहकार्य मिळाले आहे

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.