जीवन विद्या मिशनच्या युवकांनी बुजवले खड्डे

0
 belgaum

बेळगावात पुन्हा एकदा सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे युवा सरसावले असून त्यानी धोकादायक खड्डे बुजवले आहेत.

बेळगाव मनपा किंवा सार्वजनिक बांधकाम खाते शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या बाबत उदासीनता दाखवल्या मुळे अनेक सामाजिक अध्यात्मिक संस्था संघटना खड्डे बुजवण्यासाठी पुढे येत आहेत.गोवावेस सर्कल जवळील खड्डे पहिल्या टप्प्यात बुजवल्या नंतर जीवन विद्या मिशनचया युवकांनी खड्डे बुजवण्याचे काम पुढे चालूच ठेवले आहे.

bg
Pathholes
Pathholes jeevan vidhya mission

सध्या बेळगाव शहरातील नागरिकांचे रस्त्यावरील खड्यामुळे होत असलेले हाल लक्षात घेऊन जीवनविद्या मिशनच्या युवातर्फे पिरनवाडी क्रॉस पासून मच्छे पर्यंतचे अनेक खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत खड्डे बुजवले आहेत.

यावेळीही वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत युवकांनी परिश्रम घेऊन स्व-खर्चाने या भागातील अनेक मोठ-मोठे खड्डे बुजविले जवळपास वीस ते पंचवीस लहान मोठे खड्डे बुजवत त्यांनी प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केल आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.