Saturday, April 20, 2024

/

मगरीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

 belgaum

शेतात गवत आणण्यास गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून मगरीने जखमी केल्याची घटना अथणी तालुक्यातील नंदेश्वर गावात घडली आहे.मुबारक अप्पालाल मुल्ला (२५) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नेहमीप्रमाणे शेतात जनावरांसाठी चारा आणण्यास गेलेल्या तरुणावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या मगरीने हल्ला केला.यावेळी तरुणाने धडपड करून आपली सुटका करून घेतली.

Crocodile

मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात कृष्णा नदीतून अनेक मगरी बाहेर आल्या होत्या यावर्षी नदी काठच्या गावातून मगरी बाहेर आलेल्या घटनात वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.