Friday, April 26, 2024

/

कुस्तीत शेतकऱ्याच्या कन्येने मिळवली दोन पदकं

 belgaum

अलीकडे हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या आठव्या एआयटीडब्ल्यूपीएफ राष्ट्रीय पारंपरिक कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत मध्ये बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावात राहणाऱ्या एका शेतकर्‍याची मुलगी शीतल संजय पाटील हिने दोन सुवर्ण पदके पटकावली आहेत.

19 वर्षीय शीतलने राष्ट्रीय स्तरावर प्रथमच मेडल मिळविली आहेत. बेल्ट रेसलिंग आणि मास-रेसलिंग अशा दोन स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक जिंकली आहेत.

वडील आणि आजोबांमुळेच मी कुस्तीकडे वळले. वयाच्या १२ व्या वर्षी ती कुस्तीकडे आकर्षित झालो होतो. तिचे वडील संजय पाटील यांनी शीतलला सरकारी वसतिगृहात दाखल केले. आठवीत शिकत असताना तिची ओळख नागराज आणि हनुमंत पाटील यांना झाली त्यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

 belgaum
Sheetal patil wrestling
Sheetal patil wrestling

शीतल दहावीत असताना फुटबॉल खेळताना तिला डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे तिला वसतिगृह सोडून घरी परत जावे लागले. त्याच कारणास्तव, कुस्तीच्या तिच्या प्रशिक्षणाला त्रास झाला, असे ती म्हणाली. त्यानंतर शीतलने ‘बेल्ट रेसलिंग’ आणि ‘मास-रेसलिंग’ या दोहोंमध्ये आपले कौशल्य वाढविणारे कोच अल्ताफ मुल्ला यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेणे सुरू केले.

दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत तिची निवड झाली तेव्हा शीतल बेळगावच्या ज्योती कॉलेजमध्ये पीयूसी 1 (आर्ट्स) मध्ये होती.

आता तिच्या पीयूसी -२ च्या काळात शीतलची पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आणि यावेळी तिने स्वत: ला उत्कृष्ट सिद्ध करण्याची संधीचा फायदा घेण्याचे ठरविले. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तिने 50 किलो वयोगटातील गटात चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि बेल्ट रेसलिंग आणि मास-रेसलिंग या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळविण्यात यश मिळविले.

शीतल ही ‘जय जवान, जय किसान’ प्रकारची मुलगी आहे. तिला शेतीची आवड आहे. परंतु तिच्या वडिलांच्या शेतीच्या जमीनीचा काही भाग सरकारने सुवर्णा विधान सौधा आणि उर्वरित जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासाठी स्थापित गेली आहे. म्हणूनच शीतलने भारतीय सशस्त्र सैन्यात सामील होण्याचे व देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले आहे.

शीतलची आता आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवड झाली आहे, यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. तिचे वडील निधीची व्यवस्था करण्यात गुंतले आहेत. संजय पाटील म्हणाले की, चँपियनशिप होण्याच्या स्थळ व तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु शीतलला चॅम्पियनशिपला उपस्थित राहण्यासाठी कमीतकमी साडेतीन लाख रुपयांची गरज भासणार आहे. असे त्यांनी सांगितले.

या शेतकऱ्याच्या कन्येला मदतीचा हात देण्यासाठी(9945570764संजय पाटील )या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.