Friday, April 19, 2024

/

बेळगावात कन्नड संघटनेला पोटशूळ

 belgaum

चंदगडचे नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी आमदारकीची शपथ घेताना बेळगाव,कारवार, निपाणी बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून घोषणा दिल्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे.

त्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाटील यांची प्रतिमा दहन करून आपला पोटशूळ शमवून घेण्याचा प्रयत्न केला.कन्नड संघटनांकडे मराठी,कन्नड वाद सोडून दुसरे कोणतेही विषय नाहीत.त्यामुळे सीमाप्रश्न,मराठी भाषा,मराठी संस्कृती याचे काहीतरी भांडवल करून फुकटची प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात.

सेंट झेव्हीयर्स शाळेसमोर आमदार राजेश पाटील यांची प्रतिमा दहन करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न कन्नड वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.