Thursday, April 25, 2024

/

एअर मार्शल बुटोला यांनी दिली सांबरा हवाई दलास भेट

 belgaum

भारतीय वायू दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ , एअर मार्शल ए. एस.बुटोला यांनी सांबरा येथील हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कुलला भेट दिली. एअर कमोडोर आर.रविशंकर यांनी त्यांचे स्वागत केले.

दोन दिवसांच्या भेटी दरम्यान त्यांनी ट्रेंनिग स्कुलच्या विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली.बुटोला यांच्या हस्ते एक हजार प्रशिक्षणार्थींच्यासाठी उभारण्यात आलेल्या मेसचे आणि अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

Air marshal butola
भारतीय हवाई दलाचे आधुनिकीकरण वेगाने होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हवाई दलात वापर केला जात आहे असे ए.एस.बुटोला यांनी प्रशिक्षणार्थी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधताना सांगितले.बुटोला यांच्या पत्नी मोनिका बुटोला यांनी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीशी संवाद साधून त्यांच्या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.