Saturday, April 20, 2024

/

मुंबईच्या मराठा स्पोर्ट्स आयकर विभाग संघाने पटकाविला साईराज चषक

 belgaum

मुंबईच्या मराठा स्पोर्ट्स आयकर विभाग संघाने पटकाविला साईराज चषक : कोल्हापूरचा छ. शिवाजी तरुण मंडळ संघ ठरला उपविजेता -महेश फगरे पुरस्कृत ” साईराज ट्रॉफी -2019 ” निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत मराठा स्पोर्ट्स, आयकर विभाग संघ, मुंबई या संघाने पेनल्टी शूट आऊटवर 5-4 अशा गोल फरकाने साईराज चषक पटकाविला.
सोमवारी सुभाषचंद्र बोस (ले ले) मैदानावर झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात मुंबई संघाने कोल्हापूरच्या छ. शिवाजी तरुण मंडळ संघाचा टाय ब्रेकरवर 5-4 अशा गोल फरकाने पराभव करून साईराज चषकावर आपले नाव कोरले.

हजारो फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत झालेल्या या अटीतटीच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी अखेरच्या क्षणापर्यंत एक दुसऱ्याला अजमावले. दोन्ही संघांना शेवटपर्यंत निर्धारित वेळेपर्यंत गोल नोंदविता आला नाही. यामुळे दोन्ही संघांचे भवितव्य पेनल्टी शूट आऊटवर अवलंबून राहिले. पेनल्टी शूट आऊटवर कोण विजयी होणार याकडे साऱ्याच फुटबॉल शौकिनांचे लक्ष लागून होते.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या सामन्यात अखेर मुंबई संघाने कोल्हापूर संघाचा पेनल्टी शूट आऊटवर 5-4 अशा गोल फरकाने विजय मिळवून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.

विजेत्या मुंबई संघाला स्पर्धा पुरस्कर्ते आणि क्रिडा प्रेमी महेश फगरे, गजानन फगरे, राहुल फगरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर, अमर सरदेसाई, अमित पाटील, जॅकी मस्करनेस, शितल वेसणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मानाचा साईराज चषक व 51 हजार रुपये रोख तर उप विजेत्या कोल्हापूर संघाला चषक आणि 25 हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून लिनेकर मेंचाडो (मुंबई ) याला वैयक्तिक स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मेंचाडो हा संतोष ट्रॉफी मुंबई संघाचा कर्णधार आहे.

उत्कृष्ट गोल रक्षक आदिल अन्सारी (मुंबई) जो 18 वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात खेळलेला ओला (कोल्हापूर ) याला कै. अमित मासेकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट स्ट्रायकर पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेचा गोल्डन बूटचा मानकरी राहुल गुरव (दर्शन युनायटेड) ठरला. शिस्तबद्ध संघ म्हणून बेळगावच्या दर्शन युनायटेड संघाला गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील पवार, योगेश हिरेमठ, श्रेयश मोरे यांनी काम पाहिले. समालोचक म्हणून विजय रेडेकर, उमेश मजुकर, इनायत तेलगी यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद चव्हाण, विजय रेडेकर, ओमकार आजगावकर, महांतेश अगसर यांनी विशेष प्रयत्न केले. बेळगावच्या सुप्रीम स्पोर्ट्स चे संचालक आणि फुटबॉल खेळाडू अक्षय चव्हाण याने स्पर्धेसाठी एन्झा या कंपनीचे फुटबॉल तर प्रवीण घाडी यांनी चषक पुरस्कृत केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.