रामदेव हॉटेलच्या मागच्या बाजूला कोल्हापूर सर्कल ते शिवबसव नगरच्या मधल्या रस्त्याला माहेश्वरी अंध शाळे समोर रस्ता नो पार्किंग झोन करा या शिवाय या रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरा,स्पीड ब्रेकर,रहदारी सिग्नल बोर्ड बसवाअशी मागणी माहेश्वरी अंध शाळा कमिटीने केली आहे.
शनिवारी सायंकाळी रहदारी आणि गुन्हे विभागाच्या डी सी पी वटगुंडी यांची भेट घेऊन निवेदन देत केली आहे.अंध शाळेच्या कॅम्पस मध्ये अंध मुले फिरत असतात या रस्त्यावर ये जा करणाऱ्या अनेक वाहना मुळे अंध मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावर नो पार्किंग आणि रहदारी सिग्नल फलक लावल्यास मोठी वाहने येणार नाहीत त्याचा विद्यार्थ्यांना कमी त्रास होईल असे देखील पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे. निवेदनाचा स्वीकार करत डी सी पी वंटगुडी यांनी सदर रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करण्याचे आश्वासन दिले.