Saturday, April 27, 2024

/

बस स्थानक वसतिगृहात सापडला मृतदेह

 belgaum

संकेश्वर बस स्थानकाच्या वसतिगृहात जळून खाक झालेला मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.मृतदेह आढळताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला.ही घटना कळताच लोकांनी बस स्थानकाच्या वसतीगृह परिसरात गर्दी केली होती.मृतदेह जळून काळा ठिक्कर झाल्यामुळे मृतदेह कोणाचा आहे हे समजणे अवघड झाले आहे.

व्यक्तीचा खून करून नंतर मृतदेह जाळण्यात आला आहे.ही घटना घडून पाच सहा दिवस झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.