Friday, April 26, 2024

/

बेळगावात तीस पासून सैनिक भरती

 belgaum

बेळगावात 30 ऑक्‍टोबर ते नऊ नोव्हेंबर या काळात सैन्य भरती होणार आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर ही भरती होणार असून महार बटालियन,प्यारा बटालियन व मद्रास बटालियन यांच्यातर्फे या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी 18 ते 42 वयोगटातील आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारावीत किमान 60 टक्के गुण असण्याची अट आहे. क्लार्क पदासाठी संगणक व टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे. उंची 160 सेंटीमीटर वजन 50 किलो छाती न फुगवता 70 सेंटिमीटर बघून 82 सेंटीमीटर असावी. शैक्षणिक पात्रता डेमीसाईल प्रमाणपत्र रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र आधार कार्ड सोबत असणे गरजेचे आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, गोवा, दीव दमण, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, लक्षदीप, पद्दुचेरी या राज्यातील पात्र उमेदवारांना संधी आहे. दहावी मध्ये किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.