Friday, March 29, 2024

/

पुरात लघुपाटबंधारे कोटींचा फटका

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक खाती कामाला लागली आहेत. असे असतानाही लघुपाटबंधारे विभागाला 55 कोटीचा फटका बसला आहे. यामुळे याचा विचार करून राज्य सरकारनेही याबाबत पाऊल उचलले आहे.

नुकत्याच झालेल्या पूर आणि मुसळधार पावसामुळे लघु पाटबंधारे खात्याचे राज्यात 445 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बेळगावला 55 कोटीचा फटका बसला आहे. त्यामुळे ही खाती केंद्र सरकार व राज्य सरकारकडे निधी मंजूर करून घेण्यासाठी धडपड करत आहेत. याबाबत केंद्र सरकारने फक्त अकरा कोटी रुपये राज्याला देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र नुकसानीचा आकडा पाहता ताळमेळ जमत नसल्याचे दिसून येत आहे.

बेळगाव, कारवार, हावेरी, विजयपुर आणि कोप्पळ येथे नुकसान झाले आहे. खंडित झालेल्या ठिकाणांना जोडण्यासाठी विभागामार्फत प्राधान्य दिले जात आहे. खराब झालेल्या बॅरेजमध्ये पाणी त्वरित बंद होईल. रस्ता, पूल आणि इतर कायमस्वरूपी मदत कामे हाती घेण्यात येतील, असे मंत्री मधुस्वामी यांनी सांगितले आहे.

 belgaum

पाच लाखांपेक्षा कमी अनुदानाचे काम त्वरित सुरू केले जाईल. एनडीआरएफ मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील लघु पाटबंधारे विभागाला 454 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून केवळ 11 कोटींची भरपाई केंद्र सरकारकडून केली जाणार आहे. त्यामुळे दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे राज्य सरकारने हाती घ्यावीत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील पुरामुळे एकूण 55 कोटींचे नुकसान झाले आहे. रस्ते तसेच इतर कामे हाती घेण्यात आली असून लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने उर्वरित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. कामांची निविदा प्रक्रिया करण्यात येत असून कंत्राटदारांनी यामध्ये सहभाग दर्शवत लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Madhu svamy

बेळगावातील तलावांचा विकास करा-लघु पाटबंधारे मंत्र्यांना साकडं

बेळगाव शहर परिसरतील तलावांचा विकास करा अशी मागणी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी लघु पाट बंधारे मंत्री मधू स्वामी यांच्याकडे केली आहे.बुधवारी ते बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

शहराच्या सभोताली असलेल्या बसवण कुडची येथील तीन,आलारवाड कणबर्गी आणि मुत्त्यानट्टी येथील एक अश्या सहा तलावांचा विकास करा अति वृष्टी मुळे तलावाना नुकसान झाले आहे शेतीचे देखील नुकसान झाले आहेयासाठी शासनाने तात्काळ तीस कोटी निधी मंजूर करावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.