Friday, April 26, 2024

/

व्यसन- कधी, कुठे आणि किती करावे?

 belgaum

व्यसन – हा प्रश्न लहान मुले किंवा प्रौढांसाठीच नव्हे तर समाजासाठी आहे कि कधी, कुठे आणि किती करावा? -आपल्याला बर्याचदा असे वाटते की आपल्याकडे जीवनात प्रत्येक गोष्ट असणे आवश्यक आहे, परंतु प्रत्येकासाठी काही मर्यादा आहेत आणि आयुष्यात आपल्याला नेहमी असे वाटते की काही गोष्टी कमी पडतच आहेत. आपल्याला आपले काळज्या नव्हे तर आपले आशीर्वाद मोजण्याची आवश्यकता आहे.. सवयी प्रगतीपथाचे व्यसन असू शकतात … जर आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय असेल तर हळूहळू आपल्याला त्याचे व्यसन होईल. मोबाईल फोन, सोशल मीडिया, दारू, तंबाखू, ड्रग्ज, नकारात्मक विचार, निरोगी संबंध न ठेवता येण यासारखी व्यसने असू शकते, यासारख्या अनेक गोष्टी सूचीबद्ध आहेत. ज्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही त्यालाही व्यसन म्हणू शकतो.

व्यसनाधीन झाल्यावर, आपण आपल्या स्वतःच्या भावनांवर अधिक लक्ष केंद्रित करतो, स्वत:च्या जिंकण्याकडे अधिक आक्रमक होतो आणि प्रत्येक व्यक्तीपुढे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो.

एखादी व्यक्ती व्यसनाधीन कशी होते? ते यासाठी अधिक वेळ घालविण्याची तयारी ठेवतात, त्या दिशेने अधिक प्रयत्न करण्याचा विचार करतात आणि हे करत करत ते आता अपेक्षित ध्येय किंवा लक्ष्याच्या जवळ आले आहेत हे बघू लागतात. (उदाहरण, व्हिडिओ गेम्स). या टप्प्यात, आपण एक सकारात्मक बाजू बघू शकतो कि हे लोक आपला योग्य वेळ देऊन आणि अथक प्रयत्न करून त्यांची लक्ष्ये/उद्दिष्टे कशा गाठता येतील हे पाहतात व याचे महत्त्व ह्या लोकांना समजत असते, परंतु आयुष्यातल्या समस्यांचा सामना करताना हे लोक नेहमी गोंधळलेले, चिडचिडे, निराश आणि आक्रमक वर्तन करतात. प्रत्येकाने हे समजून घेणे आवश्यक आहे की आपले जीवन ह्या प्रकारे खेळला जाणारा खेळ आहे आणि विनाशी विचार हा कधीच नाही करायचा.

 belgaum

व्यसन थांबविणे, पुन्हा सुरू करणे, परीक्षण करणे आणि व्यवस्थापित करणे शक्य आहे परंतु गमावलेल जीवन परत मिळू शकणार नाही.

म्हणूनच हे समजून घेणे महत्वाचे आहे की आपल्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे आपले प्रिय असलेले नाते, यामध्ये भौतिकवादी गोष्टी किंवा कोणतेही व्यसन अजिबात जागा असू नये. संबंध गमावणे आणि नवीन जोडणे हा आजचा कल आहे आणि मागील नटे संबंधांवर टीका करणे, त्यांना नवे ठेवणे यातून तो दिसून येतो.

व्यसनाधीनता लोकांना कोणत्या टोकावर घेऊन जाते हे आपण पाहिले आहेच. जर विश्रांती आणि कांहीजण आनंद मिळवणे ह्या कारणासाठी व्यसन करत असतील तर इतरही बऱ्याच गोष्टी आहेत जिथे एखाद्यास ते सापडेल, परंतु केवळ विश्रांतीसाठी जर एखाद्या व्यक्तीने व्यसन मर्यादा ओलांडणे हे कोणत्याही दृष्टिकोनातून उचित नाही.
व्यसन किंवा सवयींवर कधी, कुठे आणि किती या सूत्रा प्रमाणे जर परीक्षण केले (जेव्हा योग्य वेळ असेल, योग्य जागा असेल, आणि ती कितपत करावी) तर त्यामुळे व्यसनाचे दर हळूहळू खाली येऊ शकतात. या गोष्टींचे अनुसरण केल्याने आपण कोणत्याही धोक्यांपासून बाहेर येऊ शकाल, अधिक निष्ठावान बनू शकाल आणि अधिक समाधानी रहाण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल. याद्वारे, आपल्याला विश्रांती किंवा आनंदी होण्यासाठी व्यसनात जाण्याची इच्छा कधीही होणार नाही.

व्यसन प्रेरणा अधिक बळकट होतात कारण लोकांना त्यातून मिळालेला आनंद आहारी जाणारे पाहतात म्हणूनच ते व्यसनाचे प्रमाण अधिक करतात, कारण त्या व्यसनाशिवाय इतर कशाचीही त्यांना जाणीव होत नसते. या भावनांवर किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी एखाध्या आपल्या जवळच्या नात्यातील किंवा या विषयातील तज्ञमंडळींशी याबद्दल नेहमी मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात, आपल्याला मदत करतील, व परिस्थिती समजून घेतील आणि या प्रक्रियेत आपण शोधत असलेला आनंद किंवा विश्रांती आपल्याला नक्कीच मिळू शकेल.

समाजातील ज्येष्ठ सदस्यांचा दृष्टीकोन तरुणांपुढे असा असला पाहिजे की “आपला समाज खूप उत्तम आहे” आणि असे म्हणणे टाळा की “आजकाल लोक पूर्वीसारखे राहिले नाही, कामापुरते असतात, किंवा त्यांना इतरांच्या समस्येमध्ये रस नसतो.” मुले अशा गोष्टीमुळे आशा गमावतात आणि स्वतःमध्येच जास्त गुंतण्याचा प्रयत्न करतात, समाजात मिसळणे आणि स्वतःची समस्या समजून घेण्यात ती अपयशी ठरतात. यामुळे ती कुणालाही सांगण्यास संकोच करतात आणि स्वतःच मार्ग बनवायचा प्रयत्न करतात, ज्याचा बऱ्याच वेळेस त्यांना स्वत:ला आणि मोठ्या प्रमाणात इतर समाजाला त्रास होऊ शकतो.

हे समजणे फार महत्वाचे आहे की आज जग खूप वेगाने पुढे जात असताना भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला योग्य मूल्ये निर्माण करण्याची आणि निरोगी संबंधांची आवश्यकता आहे. प्रौढ किंवा मूल, वैयक्तिक किंवा व्यावसायिक व्यक्ती असो व्यसनांशी संबंधित असेल तर हे कधी, कुठे, आणि किती करायचे यावर विचार करून वागायला सुरु केले पाहिजे, ज्यामुळे आपल्या समाजात आवश्यक बदल दिसू लागतील.. कृपया आपला समाज सुंदर व सुधारण्यासाठी प्रत्येकाने योगदान ध्या..

लेखक-तेजस कोलेकर
Personal Coach, Educator
9916835550

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.