Friday, April 26, 2024

/

क्लार्क ते पीडीओ व्हाया कोट्यवधीची माया

 belgaum

तालुक्यातील पूर्व भागात मोबाईल नसलेल्या पीडीओची चर्चा मात्र आता चांगलीच रंगत आहे. त्याच्या कारनाम्यामुळे अनेक नागरिकातून संताप व्यक्त होत असून त्याचा जीवनप्रवास काहीसा धक्कादायक असाच आहे. मार्केट यार्ड मध्ये क्लार्क म्हणून कामाला लागलेल्या आणि त्यानंतर मंडळ ग्रामपंचायत येथे क्‍लार्क पासून सुरुवात केलेल्या पीडीओने अल्पावधीत कोट्यावधीची माया जमा केल्याची माहिती मिळाली आहे.

1994 साली मंडळ पंचायत असताना तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी म्हणून बळीराम नावाची एक व्यक्ती होती. त्याच्या हाताखाली क्लार्क म्हणून काम करणाऱ्या आणि जिल्हा पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मोबाईल नसतानाही रेंज ठेवणाऱ्या, त्याकाळी देखील संबंधितांना हाताला धरून सर्वे क्रमांकाचे एनए करून देण्यात बक्कळ माया जमविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेकांना देशोधडीला लावून स्वतःचा खिसा भरण्यातच धन्यता मानणाऱ्या त्या पीडिओ बाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

1994 च्या दरम्यान मार्केट यार्ड मध्ये काहीजणांना हाताशी घेऊन संबंधित पीडिओने एक दुकान थाटले होते. मात्र त्यांच्यात वादावादी निर्माण होऊन ते दुकान बंद पडले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीत लागणाऱ्या आणि कणबर्गी परिसरात बुडा अखत्यारित येणाऱ्या जमिनीमध्ये सर्वे क्रमांकाचे एनए करून देण्यास त्यांने पुढाकार घेतला होता. त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एनए करून देण्यासाठी त्याने बरीच माया जमवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकेकाळी खाण्यापिण्याचे वांदे असताना आज कोट्यवधीची मालमत्ता जमा करणाऱ्या पीडीओची चौकशी होणार का? आणि विशेष म्हणजे जिल्हा पंचायत वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरुन त्याने केलेले कारनामे उघडणार का? हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

 belgaum

सध्या मोबाईल नसलेल्या पीडीओकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे. एक आलिशान बंगला आणि भाडेतत्त्वावर त्याने संकुल हि बांधून दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष करून उद्योग खात्रीतील कामांमध्ये त्याने मोठी माया जमा केल्याची माहिती मिळाली आहे. कंत्राटदार आणि त्याच्या हाताखालील कामगार दाखवून सारे एकटाच करत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष करून रोजगार जास्ती दाखवण्याची गरज असते मात्र त्याने काही ठिकाणी लागणारे साहित्य अधिक दाखवून त्यामध्ये बक्कळ पैसा कमवण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अशा पीडीओची चौकशी होणार का? हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर त्याच्या हाताखाली असणाऱ्या काही व्यक्ती ही कोट्याधीश झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याची माहिती देखील लवकरच बेळगाव Live च्या माध्यमातून देण्यात येईल यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.