Monday, May 6, 2024

/

आयेशा चित्रपटाचा ट्रेलर रोखा

 belgaum

टिपू सुलतान संघर्ष समिती बेळगाव ने केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांना बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन दिले आहे. आयेशा मदर ऑफ बिलिव्हर्स हा येऊ घातलेला चित्रपट सुन्नी मुस्लिमांच्या भावना दुखावणारा आहे. यामुळे त्याच्या प्रदर्शनाला आणि ट्रेलर दाखवण्यावर रोख घालावा अशी मागणी केली आहे.

गुरुवारी बेळगावच्या टिपू सुलतान संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी, आगामी दिवसात प्रदर्शित होणाऱ्या वाशीम रिझवी दिग्दर्शित आयेशा मदर ऑफ बिलिव्हर्स या चित्रपटात धार्मिक भावना दुखावणारा संदेश असल्याने हा चित्रपट देशात तसेच राज्यात प्रदर्शित करु नये अशी मागणी केली .

शिया वक्फ बोर्डाचा चेअरमन वासीम रिझवी हा या चित्रपटाचा निर्माता असून ट्रेलर मध्येच चुकीची व निंदा करणारी भाषा वापरण्यात आली आहे. यामुळे देशातील शांतता व सुव्यवस्थेचा धोका होऊ शकतो असे निवेदनात म्हटले आहे.सर्वप्रथम या चित्रपटाचे ट्रेलर आणि त्यानंतर चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.