Wednesday, December 25, 2024

/

रेल्वे राज्य मंत्र्यांची ए पी एम सी भेट

 belgaum

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शनिवारी सकाळी बेळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली रस्त्यांची पहाणी करून ए पी एम सी मध्ये बैठक घेतली.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अनुकूल होईल असे काम करण्याची गरज असून बेळगावची ए पी एम सीचे नुकसान करू नये कोणत्याही स्थितीत सरकारने शेतकऱ्यांचे हित जपायला हवे आगामी दिवसांत सरकारकडून सर्व सुविधा ए पी एम सी ला मिळतील असे आश्वासन त्यांनी दिले.बेळगाव जिल्हा राज्यात मोठा जिल्हा असून या जिल्ह्याला चार मंत्री पदे मिळतील अशी आशा मंत्री अंगडी यांनी व्यक्त केली

यावेळी ए पी एम सी अध्यक्ष आनंद पाटील उपाध्यक्ष सुनील गड्डे प्रमोद पाटील,आप्पा जाधव आदींनी अंगडी यांचा सत्कार केला.शहर स्मार्ट होत असताना ए पी एम सी मार्केट देखील स्मार्ट व्हायला हवं पुढील 50 वर्षांचा विचार करून ए पी एम सी हायटेक झालो पाहिजे असें मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.देशात राज्यात दोन्हीकडे भाजप सरकार असल्याने ए पी एम सी च्या समस्या मिटतील असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.