बेळगाव ते वास्कोला जोडणारी बेळगाव वास्को रेल्वे 20 जुलै रोजी उद्घाटन करून सुरू करणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र पुन्हा उद्घाटन पुढे ढकलले असल्याचे रेल्वे खात्याने जाहीर केले आहे.
यामुळे या रेल्वेच्या सुरू होण्याची शक्यता धूसर झाले. 26 जुलै पासून 26 ऑक्टोबर पर्यंत रेल्वे सुरू राहणार असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार आणि शनिवारी रेल्वे बेळगाव आणि वास्को दरम्यान धावणार होती.
या रेल्वेमुळे व्यापार पर्यटन भाजीपाला वाहतूक मांस वाहतूक तसेच इतर अनेक कारणासाठी बेळगाव गोवा मध्ये दुवा निर्माण होणार होता .त्यामुळे रेल्वेचे स्वागत बेळगावकर करणार होते. रेल्वे खात्याने रेल्वेचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले असून लवकरच जाहीर केले जाईल असे सांगितल्याने पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे.
ही रेल्वे सोयीची असून ती लवकरात लवकर सुरू व्हावी. उद्घाटन पुढे न ढकलता रेल्वेचे कामकाज सुरू व्हावे. 26 जुलै पासून रेल्वे सेवेला प्रारंभ करावा अशी मागणी बेळगावच्या सिटीजन कौन्सिलने केली आहे.
Good news for belgaum people