Saturday, April 27, 2024

/

असेही झाडांचे जतन

 belgaum

कुमारस्वामी ले आऊट रोड वरील झाडे पिरनवाडी तलावात जगवत वन खात्याने रस्ता रुंदीकरणात आलेली झाडांना जीवदान दिलेलं आपण पाहिलं आहे मात्र बेळगावात अशीही दोन मोठी झाडे थेट रस्त्याच्या मधोमध आली आहेत त्यांना जगवण्यात आलं आहे.

रणरणत्या उन्हात झाडांचे महत्व कळून येते. विकास कामांच्या नावाखाली अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते. काही ठिकाणी गरज नसतानाही वृक्षांचा बळी दिला जातो.

TRee on road

 belgaum

(फोटो :न्यू गांधीनगर – सांबरा रोड वर रस्त्याच्या मधोमध वाचवलेलं झाडं)

याउलट निसर्गाचा सन्मान करणाऱ्याकडून घर बांधताना अथवा रास्ता निर्माण करताना अडचण ठरणाऱ्या झाडांना जीवनदान दिले जाते .
परदेशात सोशल मीडियावर त्या छायाचित्राना व्हायरल केले जाते.

Tree on road

(फ़ोटो खमकारट्टी जवळील लेआऊटमधील रस्त्याच्या मधोमध असलेले झाड)

स्थानिक पातळीवर क्वचितच असा प्रकार दिसून येतो. बेळगाव शहरालगत अश्या प्रकारे दोन ठिकाणी 4 झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. न्यू गांधीनगरहून सांबरा रोडला जोडणाऱ्या संपर्क मार्गावर तीन झाडांना वाचवण्यात आले आहे. झाडे न हटवता रस्त्याची दिशा बदलण्यात आली आहे.

तसेच सुवर्णविधानसौध जवळील खमकारट्टी गावाजवळ नव्याने घालण्यात आलेल्या ले-आऊट मधील रस्त्याच्या मधोमध आलेल्या झाडाचेही जतन करण्यात आले आहे.ग्लोबल वार्मिंग च्या युगात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे जितके गरजेचे आहे तितकेच गरजेचे असलेली झाडे वाचवणे देखील आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.