Friday, September 20, 2024

/

पावसाळ्यात आहारात करा काही खास गोष्टींचा समावेश

 belgaum

पावसाळा हा आल्हाददायक ऋतू आहे. या दिवसामध्ये सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. त्यासोबतच हवेमध्येदेखील गारवा आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे अनेकांना या दिवसांमध्ये काही शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करून आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो:

▪ *आलं:* खासकरुन पदार्थांची चव वाढविणारा हा पदार्थ आरोग्यासाठी तितकाच गुणकारी आहे. आल्याचा नियमित वापर केला तर पोटाचे विकार होत नाही. तसंच पोट साफ होण्यासही मदत होते. पावसाळा आला की अनेक घरांमध्ये गृहिणी चहामध्ये आलं टाकतात. आल्याचं सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. त्यासोबतच शरीरातील वातही निघून जातो. सर्दी खोकला साठी सुद्धा आलं उपयुक्त आहे.

✅ *गवती चहा:* गवती चहा सर्वसाधारण गवताप्रमाणेच दिसतो. परंतु त्याची पाने ही मोठी आणि हाताला थोडीशी चरचरीत लागतात. पावसाळ्यामध्ये गवती चहाची पानं चहात टाकून तो उकळला जातो.गवती चहाने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी की आपल्याला या दिवसांमध्ये उपयुक्त असते. गवती चहामध्ये अँटिऑक्सिडंट्सचा पण भरपूर प्रमाणात समावेश असतो.

?‍♀ *लिंबू:* लिंबाचे अनेक फायदे आहेत. विशेष करुन पावसाळ्यामध्ये आहारात लिंबाचा समावेश आवर्जुन केला पाहिजे. लिंबूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. त्यामुळे या दिवसामध्ये लिंबू सरबताचे सेवन करावे, लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. त्यासोबतच त्याच्या सेवनामुळे पोटाचे कार्य सुरळीत चालते.

थोडक्यात महत्वाचे

?☘ *निसर्गोपचार*?☘

*आरोग्य साठी सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट, हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट. शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा. (२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगी, गुटका,डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. (१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तदाब, ब्लडप्रेशर वाढतो. (१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही (१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी सुंठ व मध चाटावा कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – *सर्दी, खोकला, ताप येत नाही.*

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर *लकवा (पॅरालीसीस)* येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर *मुखदुर्गंधी* निघून जाते व *अपचन* होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर *हार्ट अटॅक* येत नाही.

५) *स्मरण शक्ती* साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर *कॅन्सर* होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे – *हाडे मजबूत होतात.*

९) *ऐकू न येणे*- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) *शरीरशुद्धी साठी* वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे – हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) *जुलाबासाठी*- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) *नाकाचे हाड वाढणे*- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) *मुळव्याधासाठी*- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ – ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४) *सहा महिन्यातून एकदा पंचकर्म करा.* सहा प्रकारच्या फायटोजेल केवळ खाण्यानेही संपूर्ण शरीराचे अगदी पेशीस्तरीय पंचकर्म होते. असे रशियन पंचकर्मही मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे केवळ रु.६०००/- मध्ये मिळते व त्या सेटमध्ये दोघांचे पंचकर्म होते. म्हणजे प्रत्येकी केवळ रु.३०००/- इतका किरकोळ खर्च येतो. ज्यांना पारंपारिक पंचकर्म करण्यासाठी वेळ नाही अशांना हे केवळ खाऊन पंचकर्म करण्याचा अधुनिक उत्तम पर्याय आहे.

??????????
*???आरोग्य प्रभात???*
*कंबर दुखणे*

*1. विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.*

*2. योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील( योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबर दुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात )*

*3. सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.*

*घुडघे दुखणे:*

*1. आपले संपूर्ण वजन आपला गुडघा उचलतो. त्यामुळे आपले वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी! म्हणून तरुणपणापासूनच आपले वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम.*

*2. गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावे. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात. ते रोज 10 मिनिटे करणे अति उत्तम.*

*3. शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.*

*4. प्रचंड वेदना असतील तर स्वत:हून फक्त पॅरॅसिटेमॉल (उदा. क्रोसीन)ची गोळी घ्यावी किंवा मलम लावावे.*

*5. सुरुवातीला पट्टे (नी-कॅप) वापरणे चालू शकते. परंतु त्याचा अतिवापर टाळावा कारण त्याने स्नायू शिथिल होतात.*

*6. वृद्धापकाळात काठी वापरावी, त्याने गुडघ्यावरचा भार कमी होतो.*

*7. उत्तम प्रतीची पादत्राणे वापरल्यानेसुद्धा गुडघा सुस्थितीत राहतो.*

*सांधेदुखी:*

*१. सांध्यावर ताण पडणार नाही याची काळजी घेणे. त्यासाठी ओझी न वाहने, सारखी उठ बस न करणे, वजन कमी करणे, खूप न चालणे हे उपाय करावेत.*

*२. सांध्याभोवातीच्या स्नायुंना व्यायाम देऊन ते बळकट करावेत, परंतु गुडघे, घोटे यावर ताण पडेल असा व्यायाम करू नये.*

*३. सांधे फार दुखल्यास तात्पुरता उपाय म्हणून पॅरासिटामोल गोळी घ्यावी.*

*4. जेव्हा सांधेदुखी ही वातामुळे असते किंवा झीज झाल्यामुळे असते तेव्हा सांध्यावर कोणतेही औषधी तेल किंवा तीळ तेल लावून शेक घेतल्यास आराम मिळतो.*

*5. जेव्हा ही सांधेदुखी आमामुळे होते तेव्हा तेल लावल्याने आराम मिळत नाही उलट दुखणे वाढते, म्हणून या आमामुळे होणा-या सांधेदुखीवर पंचकर्म, औषधी, पथ्य किंवा हलका व्यायाम फार आवश्यक आहे. थंड व शिळे पदार्थ टाळावेत.*

*6. प्रकूपित रक्तातील दोषामुळे होणा-या सांधेदुखीवर दीर्घकाळ औषधी, पंचकर्म, पथ्य आवश्यक असते. ज्यामुळे आपणास दीर्घकाळ आराम मिळतो.*

*7. सध्याच्या या जगात वाहनांचा वापर, फास्ट फूड व जेवणाच्या व झोपण्याच्या अवेळा यामुळे वजन वाढते. त्यामुळे सांधेदुखी होते. या सांधेदुखीत झीज/आम/प्रकूपित रक्तातील दोष कारणीभूत ठरतात.*

*8. सांधेदुखी झाली की, तेल चोळण्याकडे रुग्णांचा कल असतो. काही विशिष्ट औषधी तेल वगळता इतर कोणतेही तेल लावल्यास आमवाताचा त्रास वाढतो. त्यामुळे आमवाताच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तेल लावू नये.*

*9. योगराज गुग्गुळ, रास्नासप्तक काढा, गंधर्व तेल, अशी वातनाशक औषधी घ्यावी. याबरोबरच रुक्ष स्वेद, वैतरण, बस्ती अशा पंचकर्म उपचारांनी आमवाताचे रुग्ण कायमचे बरे होऊ शकतात.*
??????????

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.