Friday, April 26, 2024

/

नवी रेल्वे दोन तास उशिरा

 belgaum

कालच उदघाटन झालेली नवीन बंगळूर ते बेळगाव रेल्वे आज दोन तास उशिरा आली आहे.
काळ रात्री 9 वाजता निघालेल्या या रेल्वेतील पहिल्याच प्रवाशांना अपेक्षा होती की आपण किमान सकाळी 7.30 पर्यंत बेळगावला पोहोचू कारण बेळगावला पोचण्याची वेळ होती सकाळी 7 पण ही रेल्वे दोन तास उशीर करून सकाळी 9 वाजता बेळगावला पोचली आहे. प्रवाशांना सलग 12 तास प्रवास करावा लागला आहे.New railway

अलविन या प्रवाशाने हा प्रवास फारच कंटाळवाणा झाला असे म्हटले असून एसी कोच मध्ये कालच्या पावसाने पाणी शिरल्यामुळे पाणीतूनच प्रवास करावा लागल्याचे सांगितले आहे. यामुळे तात्काळ हा शब्द बदलून विलंब असे नामकरण या रेल्वेच्या बाबत करावे अशी मागणी वाढली आहे.

सदर रेल्वे खाजगी बस पेक्षा लवकर येणे अपेक्षित आहे असे न झाल्यास अनेक प्रवाश्यांचा भ्रम निरास होऊ शकतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.