Sunday, July 14, 2024

/

झोपडपट्टीत रहाणाऱ्या वृद्ध महिलेचा खून

 belgaum

अज्ञातानी गोगटे सर्कल जवळील जुन्या गोगटे गार्डन जवळील झोपडपट्टीत प्रवेश करून एका वृद्ध महिलेच सिमेंट च्या टाईल्स ने डोक्यावर वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.

विराघवा श्रीराम आकाश वय 85 मूळ निवासी रा. कोंडगोटूर ता. राजमन्द्री आंध्रप्रदेश असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशराम श्रीराम आकाश आणि त्याची आई विराघवा श्रीराम आकाश हे दोघेहीगोगटे सर्कल जवळील जुन्या गोगटे गार्डन जवळील झोपडपट्टीत वास्तव्यास रहातात.परशराम हा रस्त्यावर पडलेले रट्ट रद्दी आणि प्लास्टिक बाटल्या गोळा करण्याचे काम करतो.

रविवारी रात्री तो झोपडी बाहेर गेला असता अज्ञातांनी झोपडीत प्रवेश करून त्याची आई विराघवा च्या डोक्यात सिमेंटच्या टाईल्सने जोरदार हल्ला केला त्यात तिचा मृत्यू झाला अशी तक्रार परशुराम यानें पोलिसात दिली आहे.या प्रकरणी कॅम्प पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस हा खून कुणी केलाय याचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.