Friday, April 26, 2024

/

त्या हुशार विद्यार्थिनींला मदतीचा ओघ सुरूच!

 belgaum

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती गरीबीवर मात करत जिद्द आणि हुषारीच्या जोरावर उचगाव येथील प्रगती लोहार या विद्यार्थिनीने एस एस एल सी परीक्षेत 94.8%गुण मिळवत यश मिळवले होते.इतके चांगले गुण मिळवत ती उचगावं सेंटर मध्ये पहिली आली होती तिची यशोगाथा बेळगाव live ने मांडत पुढील शिक्षणासाठी मदतीचे आवाहन केले होते त्या नुसार समाजातील विविध स्तरातून हळूहळू का होईना तिला मदत मिळत आहे.

Help poor student

बेळगाव live च्या आवाहनाला प्रतिसाद देत अनंतशयन गल्ली येथील गणेश ट्रेडर्सचे मालक संतोष यांनी पुढील शिक्षणासाठी दहा हजारांची आर्थिक मदत देऊ केली होती त्या नंतर आज मुतगे येेथील ग्रा प सदस्य भाऊ पाटील यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5001 रू  आर्थिक मदत दिली आहे.

 belgaum

या विद्यार्थिनीला शिकण्याची इच्छा आहे पण शिक्षण घेणे अवघड आहे यासाठी समाजाने अजूनही मदत करण्याची गरज आहे.स्वतंत्र अभ्यासाची सोय नाही, एका झोपडीवजा घरात राहताना तिने आपले शिक्षण पूर्ण शिक्षण केले आहे, त्या पुढील शिक्षणासाठी तिला मदतीची गरज असून इच्छुकांनी 9448340028(संजय पाटील )संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.