Tuesday, June 25, 2024

/

संभाजी पाटलांच्या मृत्यचे कारण स्पष्ट करा

 belgaum

माजी आमदार संभाजी पाटील यांचा नैसर्गिक मृत्यू आहे की नाही  त्यांच्या मृत्यू चे कारण स्पष्ट व्हावे अशी  फिर्याद माजी आमदार संभाजी पाटील यांची कन्या संध्या यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

माजी आमदार संभाजी पाटील यांनी चारवेळा महापौरपद भूषवले होते.त्यांच्या मुलीने पोलिसात संभाजी पाटील यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट  व्हावे म्हणून  फिर्याद दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संध्या यांनी वडिलांच्या मृत्यूविषयी   संशय व्यक्त केल्याने फिर्यादी मुळे   संभाजी पाटील यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले आहे.पोस्टमॉर्टेम झाल्यावर संभाजी पाटील यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला होता.पोस्टमॉर्टेम चा अहवाल आल्या नंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.