Saturday, April 27, 2024

/

शिवरायांची मिरवणूक तेरा तास!

 belgaum

शहराच्या मध्यवर्ती भागात शीवरायांचे एका पेक्षा एक चित्ररथ डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. शिवरायांच्या शताब्दी महोत्सवात ऐकून 67 चित्ररथांचा सहभाग होता.
नरगुंदकर भावे चौकातुन बुधवारी सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. आणि शेवट सौम्य लाठीमारनी गुरुवारी सकाळी सात वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकात मिरवणुकीची सांगता पोलीस आयुक्त लोकेशकुमार, ए सि पी मार्केट एन व्ही बरमनी,महांतेश्वर जिद्दी, पीएसआय चंद्रकीर्ती, कल्याणशेट्टी, आमदार अनिल बेनके, किरण जाधव, बेळगाव शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल जाधव, दीपक हळदणकर, शरद पाटील, शहापूर महामंडळाचे कार्याध्यक्ष महादेवराव पाटील, खडक गल्लीचे राहुल जाधव,सुनील कणेरी, संजय जाधव,प्रसाद शिरवळकर, विकास देसुरकर,  यांच्या उपस्थित झाली.

मिरवणुकीच्या मार्गावरील तब्बल 30 हुन अधिक चित्ररथ  पहाटे किलोस्कर रोड मार्गे आपल्या गल्लीत जात होते.तर धर्मवीर संभाजीराजे चौक ते समादेवी गल्ली पर्यंत  सकाळी सहा वाजेपर्यंत  तब्बल 20 हुन अधिक चित्ररथ होते.  सहा वाजून पंधरा मिनीटांनी काही कार्यकर्ते आपसांत भांडत होते, यांना पांगविण्यासाठी  सौम्य लाठी पोलिस अधिकाऱ्यांना उचलावी लागली, यानंतर एक तासांतच पोलिस प्रशासनाने  मिरवणुकीची सांगता केली.
नरगुंदकर भावे चौक आणि गणपत गल्ली,येथील मिरवणुकीत रात्री  11 पर्यंत जवळपास 35 चित्ररथांचा सहभाग झाला होता. परंतु समोरील काही चित्ररथावरील ढोल ताशा पथक असल्याने त्यांना आपली कला सादर करण्यासाठी किमान अर्धा तासांहून अधिक वेळ लागल्या मुळे पुढील चित्ररथ सरकण्यास दिरंगाई होत होती.

सुरवातीच्या 15 चित्ररथातील एक डिजेचा चित्ररथ रात्री दीड वाजता गोंधळी गल्लीतून चवाट गल्लीच्या चित्ररथासमोर सहभाग झाला. यानंतर मिरवणुकीच्या मध्यभागी तीन ,आणि शेवटी चार, चित्ररथावरील डी जे वर 15 ते 28 वयोगटातील तरुणाई नशेच्या धुंदीत थिरकत होती . यांच्या आवाजामुळे  मारुती गल्लीतील सजीव चित्ररथावरील अडथळे निर्माण झाले होते.

 belgaum

Shiv jayanti

संवेदनशील भागातील चव्हाट गल्ली, खडक गल्ली, खंजर गल्ली, चित्ररथाची आणि संपूर्ण मिरवणुकीत काही गोंधळ होऊ नये अशी सूचना वैयक्तिक पोलिस समुदाय येथे झालेल्या शांतता बैठकीत मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे कार्याध्यक्ष श्री सुनिल जाधव यांचे नाव घेऊन बैठकीत सूचना केली होती, मार्केट ए सि पी नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक शांततेत पार पाडली .

Shivneri
बेळगावातील बेळगाव शहर, शहापूर, अनगोळ वडगाव विभागातील सर्व  शिवजयंती चित्ररथाना युवा समिती तर्फे शताब्दी वर्षा निमित्त स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. युवा समितीचे सर्व सहकारी अहोरात्र स्वयंसेवकांची भूमिका बजावत होते. शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीदरम्यान जागोजागी आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या युवा समितीच्या सदस्यांनी मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी आपल्या परीने योग्य ती भूमिका बजावून युवा वर्गासमोर आदर्श ठेवला आहे.

काहीजणांनी  शिवरायांच्या मिरवणूकित डी जे लावून इतिहास बदलण्याची मागील काही वर्षांपासून शपथच घेतली आहे, ते पुढे येत नाहीत , पडद्यामागून लाखो रुपयांची मंडळांना देणगी देऊन प्रोत्साहन देत आहेत, हे दुर्दैव ठरत आहे, यापुढील काळात तरी बदल गरजेचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.