Saturday, May 4, 2024

/

पोहायला गेलेला बालक बुडाला

 belgaum

पालकां सोबत कपडे धुण्यासाठी गेलेला बालक पाण्याच्या क्वारीत बुडून मरण पावल्याची घटना मंगळवारी दुपारी हलग्याजवळील आर एन शेट्टी तलावात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसय्या शिवानंद हिरेमठ वय 13 रा. टिळक चौक बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. हलगा येथील आर एन शेट्टी तलावात तो आपल्या पालकांसह गेला होता त्यावेळी पोहायला गेला असता सदर घटना घडली आहे.

मंगळवारी दुपारी या आर एन शेट्टी तलावात ही घटना घडली असून नैसर्गिक आपत्ती संरक्षक दलाच्या टीमने बुडालेल्या युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर शोधून काढला.या तलावात पोहायला जाऊन अनेकांचे जीव गेले असून शासनाने यावर उपाय काढून नियंत्रण करण्याची गरज आहे.हिरेबागेवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.