बेळगाव शहराच्या उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या टिळकवाडी विभागात सध्या चोऱ्या वाढल्या आहेत. शीख लोकांचे पवित्र ठिकाण असलेल्या गुरुद्वाराच्या दानपेटीवर चोरट्यांनी हातसफाई केली आहे. यामुळे आता पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरही चोरी होत असताना पोलिसांना कळत नसल्याचे स्पष्टपणे उघड झाले असून टिळकवाडी पोलीस आपल्या जबाबदारीत फेल ठरले आहेत.
चोरांनी या गुरुद्वारा मधील दानपेटी आणि सीसीटीव्ही फुटेज चा बॉक्स पळविला आहे. शीख बांधव आपल्या धार्मिक भावनेतून या ठिकाणी दान करतात आणि या दानाचा उपयोग या परिसरात राहणाऱ्या गोर गरीब लोकांना अन्न देण्यासाठी केला जातो, पण चोरट्यांनी नेमके हेच पैसे पळवले असून या धार्मिक स्थळाची देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या टिळकवाडी पोलीस स्थानकाचे या कडे दुर्लक्ष झाले आहे.
आमदार माझ्या बाजूने आहे माझे कोण वाकडे करू शकत नाही असे सांगत फिरणाऱ्या त्या कुचकामी अधिकाऱ्याला बदलल्याशिवाय टिळकवाडी पोलीस स्थानकाचे कारभार सुधारणार नाहीत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी टिळकवाडी भागात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत विचार करून कुचकामी अधिकाऱ्यांची बदली करावी व टिळकवाडी पोलीस स्थानकाला फेल मधून पास करावे अशी गरज आहे.