Friday, March 29, 2024

/

‘प्रति हल्ला करा पाकला चोख प्रत्त्युत्तर द्या’

 belgaum

काल पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत बेळगावातील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली.

गुरुवारी दुपारी जम्मू काश्मीर मध्ये सी आर पी एफ वाहनावर आत्मघातकी हल्ला झाला होता या स्फोटात सी आर पी एफ चे 49 जवानांना हुतात्म्य पत्करावे लागले होते या घटनेचा देशभरात सर्वत्र निषेध होत बेळगावातील राणी कित्तूर चननममा चौकात निदर्शन करण्यात आली.

 

 belgaum

या हल्ल्यात जैश ए मोहम्मद सारख्या देश द्रोही संघटना तसेच पाकिस्तानचा सहभाग असल्याचे उघड झाले असून  या विरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रक्ताचे उत्तर रक्तातून देण्याची गरज असून गृह मंत्र्यांनी पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारत हल्ल्याला प्रति हल्ला करावा आणि पाकला चोख प्रत्त्युत्तर द्यावं अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बजरंग दलाचे भावकाना लोहार,सुनील कणेरी,आदिनाथ गावडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.