Saturday, April 27, 2024

/

पाच स्फोटांनी बेळगावचे काकती वेस हादरले

 belgaum

कंग्राळ गल्ली कॉर्नर ,काकती वेस रोडवर एकाच वेळी कानठळ्या बसवणार पाच स्फोट झाल्याने एकाच पळापळ झाली आहे. एक कॉम्प्लेक्स मधील दुकानातून हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली असून स्फोट होऊन आग लागल्याने प्रचंड धावपळ व खळबळ माजली आहे.
कॉम्प्लेक्सची तीन मजली इमारत असून बाहेर मोबाईलचे दुकान आहे. आतमध्ये बॅटरी व इतर वस्तू विक्रीचे दुकान होते अशी माहिती मिळाली असून संपूर्ण काकती वेस हादरले आहे.

Blast kakati ves
याठिकाणी सिलिंडर चा स्फोट झाला असल्याचा ही अंदाज असून आग विझवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.
एकदम कानठळ्या बसवणाऱ्या या स्फोटांनी सायंकाळी 6 च्या सुमारास खळबळ माजली. अनेक अफवाही पसरत असून सध्या अग्निशामक दलास बोलावून घेऊन तीनही मजल्यांना लागलेली आग विझवण्यात येत आहे.

Blast

 belgaum

खडेबाजार व मार्केट पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोट नेमका कशाचा हे अजून स्पष्ट नसून तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.