2016 मध्ये राज्य शासनाने बेळगावकराना घराघरात गॅस पाईपलाईन देण्यासाठीचा करार केला. कर्नाटक इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट डिपार्टमेंट येथील ऍडिशनल चिफ सेक्रेटरी यांनी मेसर्स मेघा इंजिनीअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्याशी करार केला आहे. 2016 ला नव्वद करोड रुपयांचे काम तिन वर्षा करिता देण्यात आले होते.
2016 पासून आतापर्यंत फक्त या कालावधीत रामतीर्थ नगर आणि छावणी परिषद येथील नागरिकांना या योजनेचा लाभ काही भागात मिळत आहे. शहरवासीयांना मात्र ठेंगा देण्यात आला आहे.


गॅस पाईपलाईन मुळे नागरिकांना महिना अखेर कमीतकमी 300 रुपयापासून ते 600 रुपया पर्यंत मीटर रिडींग बिल येत आहे. याचा फायदा तिथल्या नागरिकांना होत आहे. पण बेळगावकराना प्रति महिना 1000 रुपये मोजावे लागत आहे.
यावर मेघा इंजिनीरिंग आणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांची पुढील कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी रीतसर चौकशी करून शिल्लक राहिलेला निधी बेळगाव शहराला वळवावा असे मत शहरातील समस्त नागरिकांचे आहे .
मेघा इंजिनिअरिंग चे काम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची माहितीसुद्धा मिळाली असून याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.