Saturday, July 27, 2024

/

बेकायदेशीर टॉवर ला विरोध

 belgaum

कोतवाल गल्ली येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आगा अपार्टमेंट वर मोबाईल टॉवर बसवण्यास परवानगी देऊ नका अशी मागणी केली आहे.
या अपार्टमेंट मध्ये आधीच एक लग्नाचे सभागृह आहे. यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना रहदारीच्या समस्या होत आहेत.या अपार्टमेंटला चवथ्या आणि पाचव्या मजल्याचे परवानगी देण्यात आलेले नाही.
याबद्दल महानगरपालिकेने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

Kotwal galli tower
या बेकायदेशीर मजल्यावर मोबाईल टॉवर बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या लोकांनी फ्लॅट विकत घेतले आहेत त्यांची नाहरकत न घेता हे काम सुरू आहे.

स्थानिक कोतवाल मोहल्ला जमातीकडे तक्रार झाली असता जमातीने अपार्टमेंटचे मालक दस्तगिर आगा यांना मोबाईल टॉवर बसवू नका कारण त्यामुळे १०० मिटर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका असल्याचा निकाल दिला आहे.
या आणि इतर समस्यांचा निवेदनात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.