शहर आणि परिसरात पुन्हा वातावरण बदलाची झलक पहावयास मिळाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने नागरिकांना पुन्हा एकदा गुलाबी वातावरण बदलाची चाहूल लागल्याचा अनुभव घेता आला.
सोमवारी माध्यरात्रीपर्यंत थंडीने कुडकूडणारे नागरिक मंगळवारी सकाळी अचानक काही प्रमाणात थंडी आणि धुक्याचा अनुभव घेताना दिसत होते. अचानक वातावरण बदल झाल्यामुले अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
पहाटे पासूनच कडक धुके पडू लागले होते. सूर्य दर्शनासाठी अनेकांना सकाळी 9.30 पर्यंत वाट पहावी लागली. यामुळे थंडी आणि धुक्यामुळे अनेकांनी घरी बसणेच पसंत केले. या धुक्यामुळे काही प्रमाणात थंडीत घट झाल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यात ज्या प्रमाणे गुलाबी थंडीचा अनुभव येतो तसाच अनुभव आता मंगळवारी पडलेल्या धुक्यामुळे अनुभवता आला. नुकत्याच पडलेल्या धुक्यामुके थंडी गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी काही दिवस हे धुके असेच पडल्यास काजू आणि आंबा पिकावर त्याचे परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.