Saturday, April 27, 2024

/

गॅस पेटवताना भडका उडाल्याने विद्यार्थिनींचा मृत्यू

 belgaum

सिलेंडर गॅस पेटवताना गॅस सुरू करून लायटर शोधायला उशीर झाल्याने भडका उडाल्याने झालेल्या घटनेत चौदा वर्षीय मुलगीचा भाजून मृत्यू झाला आहे.सोमवारी सकाळी लिंगराज कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस कवाटर्स मध्ये ही घटना घडली आहे.

सेजल संजीवकुमार कुऱ्हाडे वय 14 वर्षे रा.पोलीस कवाटर्स बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत आठवीत शिकत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेजल ही आपल्या स्वयंपाक घरात गॅस पेटवत असतेवेळी गॅस सुरू करून लायटर शोधत असताना उशीर झाल्याने भडका उडाला त्या घटनेत जळून गंभीर जखमी झाली होती उपचारासाठी तिला के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काहीही उपयोग न झाल्याने दुपारी तिची प्राण ज्योत मावळली कॅम्प पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

 belgaum

स्वयंपाक करताना गॅस सुरू करतेवेळी काळजी घेणे गरजेचे बनले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.