Thursday, April 25, 2024

/

‘पुरस्कार तर नाहीच, ९ हजारही गेले’!

 belgaum

बेळगाव ग्रामिणच्या आक्का फक्त आश्वासन देतात आणि त्या ते आश्वासन पूर्ण करीत नाहीत असे सध्या बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बोलण्यात येत आहे. एक शूर तरुणाला अक्कानी दिलेले आश्वासन विसरल्याने ही चर्चा सुरू आहे.कुद्रेमनीच्या मनोज धामणेकर या तरुणाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

मनोजने दोन तरुणींचा जीव वाचवला.बेळगाव Live ने ‘त्या’ दोघींना वाचवणा-या रियल हिरोची बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुद्रेमनीच्या मनोज धामणेकरचा आपल्या कार्यालयात सत्कार करून त्याची राष्ट्रपती शौर्य आणि राज्य शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी सत्कार केला आणि जाहीर केल्याप्रमाणे १०,००० ऐवजी १००० दिले होते. पण उरलेले ९००० द्यायचे राहूनच गेले शिफारस करू असे आश्वासन दिलेला पुरस्कार देखील राहूनच गेला आहे.नुकताच अनेक शौर्य पुरस्कारांची घोषणा झाली जिल्हा प्रशासनाने स्वातंत्र्य दिनी केवळ सत्कार केला  मात्र दोन मुलींचे जीव वाचवलेला मनोज अजूनही अवार्ड पासून वंचितच आहे.

Manoj dhamnekar

 belgaum

बेळगाव Live या बातम्यांच्या पोर्टलची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली होती.चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी सत्कार करण्याचं सांगितलं होतं त्यानंतर तातडीने आमदार हेब्बाळकर यांनी संपर्क करून मनोजला आपल्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार मनोजने त्यांच्या कार्यालयात हजेरी लावली. तिथे त्याचा यथोचित सत्कार करून त्यांच्या लक्ष्मीताई फौंडेशन तर्फे रोख बक्षीस  देण्यात आलं. या छोटेखानी समारंभावेळी युवराज कदम, सी सी सी पाटिल उपस्थित होते. यावेळी आमदार हेब्बाळकर यांनी तिलारी धबधब्या मध्ये बेळगावच्या दोन मुलींना बुडताना वाचवल्या बद्दल केंद्र आणि राज्य सरकारच्या शौर्य पदकासाठी त्याची शिफारस करणार असल्याच जाहिर केलं होतं पण ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही. युवराज कदम इतर  कार्यकर्त्यांनीही त्यांना ही आठवण करून दिली नाही का? बक्षिसाची उरलेली रक्कम आणि शौर्य पुरस्काराची शिफारस आपल्या नेत्यांकडून करून घेण्यात ते का विसरले का कमी पडले ?असा प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.

मनोज हा स्वतः अपंग असतानाही जिवाची पर्वा न करता ‘त्या’ दोन मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतो ही बाब कौतुकास्पद आहे. मनोजच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याने शिनोळी मध्ये नोकरी पत्करली आहे. आमदार हेब्बाळकरांच्या हस्ते रियल हिरो ठरलेल्या मनोजचा झालेला सत्कार संवेदनशील राजकारणी व्यक्तीचे प्रतिक ठरला होता. मात्र सांगायचे एक आणि करायचेच नाही या भूमिकेतून जाणाऱ्या आमदार हेब्बाळकर यांच्या असंवेदनशिलतेचीही यानिमित्तानं चर्चा ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.