Saturday, April 20, 2024

/

तर …’ विद्यार्थ्यांना मिळेल एक तास हेलिकॉप्टर प्रवासाचे भाग्य’

 belgaum

बेळगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना आता तब्बल एक तास हेलिकॉप्टर मध्ये बसून फिरण्याचे भाग्य मिळणार आहे. होय बातमी खरी आहे माजी पालकमंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी तशी घोषणा केली आहे.
कलखांब येथील मल्हार ग्रुप फौंडेशनच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस समारंभात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

Mg group

“बेळगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावावर आयोजित व्याख्यान स्पर्धेत जो विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकावेल त्याला एक तास माझ्या बरोबर हेलिकॉप्टर मधून फिरवून आणू” असे ते म्हणाले.
रविवारी रात्री कलखांम्ब येथे मल्हार ग्रुप फौंडेशन च्या वतीनं घेण्यात आलेल्या बेळगावं तालुक्यातील 53 गावासाठी विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाल्यावर ते बोलत होते. यावेळी युवा नेते जयराज हलगेकर, रामसेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर,सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव आदी उपस्थित होते.

गेल्या चार वर्षा पासून मल्हार ग्रुप बेळगाव तालुक्यातील 53 गावांसाठी आकर्षक गणेश मूर्ती स्पर्धा,वेगवेगळ्या गटासाठी व्हॉलीबॉल खो खो नृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करत आले आहे यावेळी विजेत्या खेळाडूंना स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.मल्हार ग्रुपचे अध्यक्ष पिंटू पाटील, राजू पाटीलसह अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला सूत्रसंचालन अरविंद पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.