belgaum

अ‍ॅव्हॅस्कूलर नेक्रोसिस म्हणजे हाडांच्या अस्थि पेशींचा मृत्यू होय. अस्थि पेशींना रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे या पेशी मृत होतात व सांधा किंवा तो हाडांचा भाग कायमचा निकामी होतो. तो सांधा किंवा हाडांच्या भागाला तडे जाऊन फ्रॅक्चर होतो. विशेषतः खांदा, कंबरेचा खुबा किंवा गुडघ्याच्या वाटीकडे असा प्रकार होऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत खांद्याचा नेक्रोसिस खांद्याचा सांधा याला जर रक्तप्रवाह काही कारणास्तव बंद झाला तर नेक्रोसिस होऊन तो खांदा पूर्ण बाद होतो.

कारणे-
1. स्टिरॉईडस नावाच्या औषधाचा अतिरिक्त वापर- काही प्रकारच्या संधीवातामध्ये किंवा काही असाध्य व्याधीमध्ये स्टिरॉईडसचा जास्त काळ वापर केला जातो. त्यावेळी रूग्णाला त्याच्या साईड इफेक्टांनाही तोंड द्यावे लागते. नेक्रोसिस हा स्टिरॉईडसचा एक साईड इफेक्ट असू शकतो.
2. किमोथेरपी- कॅन्सरवर उपयुक्त औषधं ही खूप स्ट्राँग असतात. कँन्सरच्या पेशी मारता मारता शरीराच्या चांगल्या पेशींनाही धोका पोहोचवतो. त्यामुळे असा रक्तप्रवाह स्टॉप होवून नेक्रोसिस होऊ शकतो.
3. अल्कोहोलिझम- दारूच्या अतिरिक्त सेवनानेसुध्दा सांध व हाड खिळखिळी होतात.
4. हाडांना मार लागल्यास किंवा इजा झाल्यास म्हणजे कधीकधी अपघात होणे. पाय घसरून पडणे, यामध्ये इजा होवून रक्तप्रवाह बंद होऊ शकतो.
5. नसा दाबल्या गेल्यामुळे (व्हॅस्क्युलर कॉम्प्रेशन) सुध्दा रक्त प्रवाह खंडित होऊन हाड कुजायला लागतात.
6. उच्च रक्तदाब रक्तवाहिनीदाह रक्तवाहिनीमध्ये रक्तात गुठळ्या होणे कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारे रॅडिएशन्स यामुळेही हाडांचा रक्तप्रवाह बंद होवू शकतो.
7. सिकलसेल, अ‍ॅनिमिया एस ल ई नावाचा संधिवात ड्रायव्हिंग करणार्‍या व्यक्तीमध्ये वातावरणातील अति उच्च दाबामुळे अ‍ॅव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होवू शकतो.
लक्षणे-
कंबरेच्या खुब्याचे हाड खांदा व गुडघा या सांध्यांना या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. खांद्याच्या नेक्रोसिसमध्ये असह्य दुखणे हात, हात खांद्यातून उचलता न येणे, खांद्यातून हात गोलाकार न फिरणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे असह्य वेदना कमरेच्या खुब्याच्या नेक्रोसिसमुळे व्यक्तिला डौलदार चालता येत नाही. नाचल्यासारखी चाल होते. असह्य वेदना असतात.

उपचार-
सांध्यांचा रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया हाच एक पर्याय उपलब्ध असतो. परंतु समजा आजार जर लवकर लक्षात आला तर मात्र होमिओपॅथीने यावर उत्कृष्ट उपचार करता येतात. रोग पूर्णतः बरा होतो. अर्थात यासाठी वेळ हा लागतोच. कित्येकदा रूग्ण देखील चमत्काराच्या अपेक्षेने होमिओपॅथीकउे वळतात. परंतु औषधे व्यवस्थित घेण्याकडे मात्र त्यांचा कल नसतो. अशाने अपेक्षित इफेक्ट मिळत नाही. कोणतेही उपचार घेताना त्याचा कालावधी यामागचे विज्ञान डॉक्टरांचा सल्ला या गोष्टी लक्षात घेणे खूप आवश्यक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.