Wednesday, October 9, 2024

/

‘मोशन सिकनेस-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स’

 belgaum
हा एक असा विकार आहे. जेथे डोळ्याने दिसणारे प्रतिमा किंवा कानातील बॅलॅंन्सींग अपरॅटस यांच्यामध्ये ताळमेळ रहात नाही. त्यामुळे गतिमान हालचालीची संवेदना आल्यास मळमळते. डळमळते याला वेगवेगळी नावे आहेत. कार सिकनेस, मोशन सिकनेस, सी सिकनेस, स्पेस सिकनेस, एअर सिकनेस इ.
या विकाराला कायनोटोसिस, ट्रॅव्हलसिकनेस किंवा सी सिकनेस अशीही नावे आहेत. गरगरणे, मळमळणे, आणि तीव्र थकवा येणे अशी सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात. क्वचित उलट्यासुध्दा होताता. बस लागणे हाच तो प्रकार होय.
कारणे-
जेव्हा आपल्या मेंदूला हालचालीची जाणिव होते. (कानातील बॅलॅंन्सिंग सेंटरमुळे) पण ती हालचाल दिसत नाही.  ( डोळ्यासमोर हालचालीची प्रतिमा न आल्यामुळे) अशा वेळी मेंदू गोंधळतो. व शरीराला सावध करण्यासाठी काही संप्रेरकांना उत्तेजन देतो. त्यामुळे शरीरात एकदम उलथापालथ होते. याला न्युरोकन्फ्युजन म्हणतात. व मळमळणे, गरगरणे असे प्रकार सुरू होतात.
काही व्यक्ती अति संवेदनशील असतात. सारखाच प्रवास करणार्‍यांना नंतर सवयीने हा प्रकार कमी होतो. परंतु काही नाजुक प्रकृतीच्या व्यक्तींना हे झेपत नाही.
उपचार-
1. मोशन सिकनेस जेथे हालचाल दिसते पण जाणवत नाही.
2. मोशन सिकनेस जेथे हालचाल दिसते पण दिसत नाही.
3. मोशन सिकनेस जेथे दोन्ही हालचाल दिसते व जाणवते पण परंतु त्याच्यात ताळमेळ नसते.
1. कार सिकनेस- जेव्हा गाडी किंवा बसमध्ये खिडकीतून बाहेर न पाहता पुस्तक वाचणे किंवा डोळे मिटून गाणी ऐकणे अशा क्रिया होतात तेव्हा मळमळते.
2. एअर सिकनेस- एक तर बंदिस्त जागा आणि छोट्या खिडक्या शिवाय हवेत गेल्यावर कानात बसणारी दडी यामुळे मळमळते.
3. सी सिकनेस- समुद्राच्या लाटावर हेलकावे खात असताना व अथांग समुद्राकडे न्युरोकन्फ्युजन होते.
4. सेंट्रीफ्युज अ‍ॅक्शन- काही वेळा जत्रेत वगैरे मोठ्या जाईंट व्हील टोरा- टोरा अशा खेळण्यामध्ये बसल्यावर उचमळते.
5. स्पिनिंग- एकदम गोलगोल फिरून चटकन थांबल्याने गरगरते.
6. चित्रपट व व्हिडीओ अति वेगात जाण्याची फिल्म फास्ट अ‍ॅक्शन खूप गोंगाट असलेली फिल्म वगैरे बघून पोटात कालवल्यासारखे होते.
7. स्पेस सिकनेस- अंतराळात ड्रायव्हिंग पॅराशूट, रायडींग, बलून रायडिंग, माऊंट नेयरिंग या प्रकारात डळमळते.
उपचार- काही रूढ उपचारामध्ये स्टेमेटिल डॉमस्टॉल इ. औषधांचा तात्कालीन आराम मिळण्यासाठी वापर केला जातो. परंतु होमिओपॅथीमध्ये मात्र हा विकार पूर्ण बरे करण्यात यश मिळते.
हे उपचार बरेच दिवस घ्यावे लागतात. शिवाय प्रवास करताना बरोबर घ्यावयाची औषधे देखील वेगळी असतात. होमिओपॅथीने गरोदरपणात होणार्‍या मॉर्निंग सिकनेस वर सुध्दा प्रभावी औषधे आहेत. फोडणीचा वास दगदग यामुळे कोरड्या उलट्या येतात. यावर होमिओपॅथीक औषधे घेतल्याने गर्भावर अनुचित परिणाम पण होत नाहीत.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.