Tuesday, April 30, 2024

/

खाज-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

खाज पडणे हे कित्येक आजारांचे लक्षण आहे. मुळातच खाज पडणे हा अत्यंत त्रासदायक, लज्जास्पद आणि सहन न होणारा प्रकार आहे. कधीही, कुठेही, कशीही खाज येऊ शकते.
पाहूया खाज पडण्याची कारणे :
1) त्वचा विकार (इसब, नायटा, बुरशीजन्य विकार, सोरीयासीस इ.)
2) मधुमेह (मधुमेहामुळे शरीरांतर्गत होणार्‍या घडामोडींमुळे त्वचेवर उगीचच खाज येऊ शकते)
3) मूत्रपिंड विकारामुळे (किडनी फेल्युअरमध्ये युरिया व क्रिऑटिनीनचे प्रमाण वाढल्यामुळे खाज पडते)
4) अ‍ॅलर्जीमुळे (औषधांच्या अ‍ॅलर्जीमुळे, किटक, धूळ इ. च्या अ‍ॅलर्जीमुळे खाज येऊ शकते.)
5) गोवर, तारुण्यपिटीका (पिंपल्स), कांजिण्या, चिकनुगुनिया या विकरांमध्येही लाल पुरळ येऊन खाज पडते. त्वचा दाह होतो.
6) श्‍वेतप्रदर (अंगावर पांढरे जाणे), मूळव्याध, फिशर, यामुळेदेखील असह्या खाज येते.
7) केसांमध्ये, त्वचेवर ऊवा व इतर परोपजीवी असल्यास भरपूर खास येते.
8) पोटात जंत असल्यास अंगावर, विशेषत: नाकावर खाज येते.
9) सर्दी पडसे झाल्यास डोळ्यांमध्ये, घशात कानामध्ये खाजवते.
10) मानसिक अस्वस्थेमुळे, बेचैनीमुळे अवास्तव कशीही खाज येऊ शकते.
11) महारोग (लेप्रसी) मध्येही खाज येते ती क्वचितच पण संवेदना मात्र जाणवत नाहीत.
उपचार : आजवर असे रुग्ण पाहिलेले आहेत की रोज सेट्रीझीन, किंवा लिव्होसेट्रीजीन अशा गोळ्या घेतल्याशिवाय त्यांना अजिबात चैन पडत नाही. कित्येक रुग्णांना तर अंगावर एक पुरळसुद्धा नसतो पण असह्य खाज मात्र येते. त्वचा विकार म्हणजे खरुज, नायटा, सोरियासीस इ. विकारांमध्ये मूळ कारणावर उपचार करावे लागतात. त्वचाविकार तद्दन इतर उपचारांपेक्षा होमिओपॅथिक औषधे जास्त गुणकारी आहेत.

Khaj
मधुमेहामध्ये योनीमार्गाकडे, बाह्य मुत्रांगावर असह्य खाज येते. रक्तशर्करा जर जास्त वाढली असेल तर मूत्रमार्ग संसर्ग लवकर होतो व खाजही खूप येते. त्यासाठी ताबडतोब उपचार करावे लागतात. अन्यथा किडनीला धोका पोहोचू शकतो. यावर खूप होमिओपॅथिक उपचार उपलब्ध आहेत. किडनी फेल्युअरच्या केसीसमध्ये डायलेसिस सोबत होमिओपॅथिक उपचार चालू करावेत. हळूहळू किडनी फंक्शन सुधाणुन डायलेसिस आठ दिवसापासून एकदा पंधरा दिवसातून एक असे करता बंद करता येते. किडनी फंक्शन पूर्ण सुधारते. ही अतिशयोक्ती नसून अशा केसीसीचा पूर्ण फॉलोअप व हिस्टरी तसेच उपचाराच्या नोंदीसकट दाखल्यासाठी ठेवलेल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या डायलेसीसनंतरचा रिपोर्ट, डायलेसीस बंद केल्यानंतरचे रिपोर्ट असा सगळा अहवालही उपलब्ध आहे.
अ‍ॅलर्जीमुळे संसर्गजन्य रोगामुळे येणार्‍या खाजेवर कारणानुसार होमिओपॅथीक उपचार घेतल्याने रुग्ण हमखास बरा होतो. मूळव्याध, फिशर, श्‍वेतप्रदर हे सगळे रोग मुळापासून बरे करता येतात. जेणेकरुन खाजेचे लक्षणही कमी होते.
ऊवा, स्केबिज यावरसुद्धा उत्कृष्ट होमिओ उपचार उपलब्ध आहेत. ऊनाशक औषधांनी फक्त ऊवा जातात पण होमिओपॅथीने मात्र लिखांसकट ऊवांचा नाश होतो.
जंतामुळे सर्दीमुळे खाजवत असल्यास होमिओ औषधांनी त्यावर पुरती मात करता येते. सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे मानसिक तणावामुळे खागज येणे. विनया इंजिनियरिंगची चौथी सेम करत होती. सबमिशन जवळ आलं की हिला सगळ्या अंगाला असह्य खाज यायची. अभ्यास, प्राजेक्ट बाजूलाच रहायचं. सेट्रिझीन घेतली की चार तास बर वाटायचं पण पेंग येणार. तिची हिस्टरी घेताना लक्षात आलंच की ही परीक्षेच्या असह्य दडपणाखाली आहे. खाजेसाठी औषध न देता, मनावरच्या दडपणासाठी औषध दिल्यावर दुसर्‍याग दिवसांपासून खाज गायब!

 belgaum
 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.