Saturday, July 12, 2025

/

‘सीमेची देवता श्री समादेवी’

 belgaum

गोव्याहून बेळगावात 300 वर्षांपूर्वी वैश्य वाणी बांधवांचे आगमन झाले. 150 वर्षांपूर्वी छोट्या स्वरूपात बेळगावात श्री समादेवीचे मंदिर बांधण्यात आले होते. त्यानंतर आता या देवीची ख्याती वाढत गेली आणि बेळगावची सीमा राखणारी देवी म्हणून तिची ख्याती झाली .

बेळगाव सह गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून या देवीचा महिमा वाढला. आज या देवीची ख्याती सर्वत्र पसरली आहे. घटस्थापनेनंतर सतत 9 दिवस देवीची वेगवेगळ्या रूपातील आरास करण्यात येते ती मनमोहक असते.

SAmadevi

 belgaum

श्री समादेवी ही पवित्र स्त्रीचे रूप मानली जाते. गोव्यातील मांडवी नदीतून आणलेलं खडक आजही मूलदेवता रुपात पुजण्यात येते. मंदिरात पितळी व चांदीच्या मूर्ती असून 3 फूट लांब व 2 फूट रुंद काळ्या पाषाणातील डमरू, त्रिशूल, कुंकवाचा करंडा व आशीर्वाद देत असलेल्या चार हस्तांची श्री समादेवी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

1957 च्या दरम्यान समाज बांधवांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवून त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. शेजारीच असलेल्या जागेत एक मंगल कार्यालयही उभारण्या आले. हे काम 1981 साली पूर्ण झाले. हे मंदिर 20 बाय 40 फुटात वसलेले आहे. या कामी वैश्यवणी समाजातील बांधवांचा हातभार मोलाचा आहे.

घटस्थापनेनिमित मंदिरात सकाळी श्री समादेवीचे विधिवत पूजा जरून घटस्थापना केली जाते.त्यानंतर पौराणिक अवतार केले जातात. दुर्गा, काली, चंडी, आंबिका, गौरी, उषा, अन्नपूर्णया रूपातील पूजा बांधली जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी महापूजा होते. श्री समादेवी मूळ स्वरूपातील सीमोल्लंघन केले जाते. 4 वाजता देऊनी पालखी ज्योती महाविद्यालयाच्या शिलगण मैदानावर जाते. पारंपरिक पद्धतीने पूजा आरती झाल्यानंतर विविध मार्गाने समादेवी मंदिरात पालखी आल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.