Friday, May 3, 2024

/

‘अतिकोलेस्टेरॉल’-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

कोलेस्टेरॉल हा एक पिवळसर चरबीयुक्त पदार्थ आपल्या रक्तात असतो. हा एक महत्वाचा घटक असूनही याची दुष्कीर्ती झाली आहे. हृदयरोगामध्ये कोलेस्टेरॉल म्हणजे खलनायक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या रक्तात कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असते त्या व्यक्तिला हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. शरीरातील बहुतांशी कोलेस्टेरॉल यकृतात तयार होते. 20 ते 30% कोलेस्टेरॉल आपण जे खातो त्यातून मिळते.
100 मि. ली. रक्तात किती कोलेस्टेरॉल आहे हे मोजले जाते. साधारणपणे 100 मिली. मध्ये 150- 200 मि. ग्रॅ दरम्यान कोलेस्टेरॉल असते काही कोलेस्टेरॉलबरोबर काही विशिष्ट मेद असतो. त्यांना लिपोप्रोटिन्स असेही म्हणतात. लिपोप्रोटिन्सचेदोन प्रकार आहेत.
1. लो डेन्झिटी लिपोप्रोटिन्स हे शरीराला घातक असून रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतात. एकूण कोालेस्टेरॉल आणि एल. डी. एल यांचे गुणोत्तर जास्त असले तर रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्याचे आणि त्यातून हृदयरोगाचे धोके अधिक असतात.
2. हाय डेन्झिटी लिपोप्रोटिन्स हे लिपोप्रोटिन्स कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते व हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कारणे आणि लक्षणे-

Colosterel charabi
अनुवंशिकता हे कोलेस्टेरॉल वाढण्याचे प्रमुख कारण आहे. जास्त उष्मांक असणारे पदार्थ (खूप तळलेले, गोड, प्रक्रियायुक्त, साखर, मैदा व तेलाचा भाग जास्त असणारे पदार्थ) सायीसकट दूध, तूप लोणी केळी, बिस्किट आईस्क्रीम, मांसाहार अशा पदार्थांना शरीरातील चरबी वाढते. खाण्यापिण्यातील अनियमितता, धुम्रपान, मद्यपान यामुळेही हा आजार होतो. मानसिक ताणतणाव, झोपेची व विश्रांतीची कमतरता यामुळे यात भरच टाकली जाते.
आहार उपचार- लेसिथिन-
अंड्यातील पिवळा बलक, वनलस्पतीजन्य तेले, डाळीची सालं, सोयाबीन आणि प्रक्रियामुक्त दुध या पदार्थात लेसिथिनचे प्रमाण भरपूर असते. लेसिथिन हा घटक फॉस्पेलिपिडयुक्त असतो. त्यामुळे कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी खाली आणण्यास मदत होते. शरीरात पुरेसे लेसीथिन असल्यास रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तरांमध्ये कोलेस्टेरॉल साचत नाही. लेसिथिनमुळे शरीरात पित्ताम्ल जास्त तयार केले जाते. त्यासाठी कोलेस्टेरॉल वापरले जाते व आपोआपच अतिरिक्त कोलेस्टेरॉल वापरले जाऊन रक्तवाहिन्यांचा धोका टळतो. आपल्या शरीरात जीवनसत्वांचा पुरेसा साठा असल्यास शरीरातील पेशीसुध्दा लेसीथिन तयार करतात.
जीवनसत्वे- बी6 जीवनसत्व, बी जीवनसत्वाचे भाग असलेले कोलाईन व इनॅसिटॉल ही जीवनसत्वे रक्ताातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. व्हीटजर्म यीस्ट किंवा धान्याचा कोंडा यामध्येही जीवनसत्वे असतात. ई जीवनसत्व रक्तातील लेसिथीनला कार्यरत अरते व कोलेस्टेरॉल कमी होते. रूग्णाने सूर्यफुलांच्या बिया, करडई, सोयाबिनचे तेल, लोणी व मोड आलेली कडधान्ये यांचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा.
इसबगोल- इसबगोल वनस्पतीच्या बियांचे तेल ज्यात 50% लिनोलिक आम्ल असते याचा उपयोग उच्चपातळीवर गेलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होतो हे तेल रोज 10 मिली आहारात घ्यावे.
तंतूमय पदार्थ- गहू, तांदूळ, बार्ली आदी धान्यांमध्ये कोंडा, तूस, धान्याचे आवरण व दाणा असतो. ही धान्ये कोंडायासकट आहारात घ्यावी, बटाटा, गाजर, बीट सलगम इ. कंद, आंबा
पेरू यासारखी फळे, कोबी, भेंडी, लेट्यूस (सुरण), सेलरी या भाज्या यामध्ये तंतूमय2पदार्थ जास्त असतात. ओट आणि मक्याचा कोंडा यांच्यामुळे एल,डी. एल. कोलेस्टेरॉल कमी होते.
आहार- हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी एल. डी. एल. ची पातळी कमी करून एच. डी. एल. ची पातळी जास्त असणे आवश्यक असते.
आपला आहार व जीवनशैली यात बदल करूल हे साध्य करता येते.

Dr sonali sarnobat

 belgaum

संपर्क -डॉ सोनाली सरनोबत

सरनोबत क्लिनिक-
केदार क्लिनिक-

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.