Wednesday, November 27, 2024

/

‘पोलीस अधिकाऱ्यांची समिती नेत्यांशी चर्चा’

 belgaum

काळ्या दिनाच्या सायकल फेरीला परवानगीचा निर्णय आगामी पंधरा दिवसात घेऊ असं वक्तव्य जिल्हाधिकारी बी एस बोमनहळळी केल असताना पोलीस खात्याने समिती नेत्यांशी चर्चा केली आहे.

बुधवारी सायंकाळी मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी यांच्या कार्यालयात समिती अध्यक्ष दीपक दळवी,मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे आदींशी पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

कन्नड संघटनांचा परवानगी देउ नये यासाठी दबाव वाढत असला तरी नेहमी प्रमाणे अटी घालून परवानगी देण्याची तयारी पोलीस प्रशासनाने चालवली आहे.काळ्या दिनाच्या सायकल फेरीत कोणता मार्ग असेल यावर अधिकाऱ्यांनी  समिती नेत्यां सोबत सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे.

यावेळी मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी,खडे बाजार ए सी पी महंतेश्वर, पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी,जे एम कालीमिरची,धीरज शिंदे आदींनी बैठकीत सहभाग घेतला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.