belgaum

खानापूरात हत्तीचे आगमन; वन खात्याच्या तत्पर कारवाईने नागरिकांना दिलासा

0
128
 belgaum

बेळगाव लाईव्ह: खानापूर शहरालगतच्या खानापूर-जांबोटी मार्गावरील शिवाजीनगर परिसरात आज सकाळी अचानक एका हत्तीचे आगमन झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. वस्तीच्या दिशेने हत्ती फिरत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एसीएफ सुनिता निम्बर्गी, आरएफओ श्रीकांत पाटील यांच्यासह पथकाने नागरिकांच्या सहकार्याने हत्तीला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले.

दरम्यान खानापूर येथील पत्रकार दिनकर मरगाळे यांनी आरएफओ श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता, हत्तीला जंगलाकडे वळवल्यानंतर तो खानापूर-हेमाडगा मार्गावरील शेडेगाळी परिसरातील सरकारी हॉर्टिकल्चर विभागाच्या हद्दीत गेल्याचे समोर आले.

 belgaum

त्यानंतर वन विभागाच्या पथकाने पुन्हा घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणत हत्तीला जंगलात परत पाठविले.काल या हत्तीचा वावर मोदीकोप्पा परिसरात होता आणि आज हत्ती खानापूर परिसरात वावरत आहे.

वन विभागाच्या तत्पर आणि संयमी कारवाईमुळे शिवाजीनगर व शेडेगाळी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. तसेच, नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.